तुर्कियेच्या नाइट क्लबमध्ये आग, 29 ठार

नुतनीकरणादरम्यान दुर्घटना : मृतांमध्ये कामगारांचे प्रमाण अधिक : पोलिसांकडून 5 जणांना अटक वृत्तसंस्था/ इस्तंबुल तुर्कियेच्या एका नाइट क्लबमध्ये मंगळवारी आग लागली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. दुर्घटनेवेळी नाइट क्लब बंद होता आणि यात नुतनीकरणाचे काम सुरू होते. मृतांमध्ये कामगारांचे प्रमाण अधिक आहे. तर 8 जणांना गंभीर […]

तुर्कियेच्या नाइट क्लबमध्ये आग, 29 ठार

नुतनीकरणादरम्यान दुर्घटना : मृतांमध्ये कामगारांचे प्रमाण अधिक : पोलिसांकडून 5 जणांना अटक
वृत्तसंस्था/ इस्तंबुल
तुर्कियेच्या एका नाइट क्लबमध्ये मंगळवारी आग लागली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. दुर्घटनेवेळी नाइट क्लब बंद होता आणि यात नुतनीकरणाचे काम सुरू होते. मृतांमध्ये कामगारांचे प्रमाण अधिक आहे. तर 8 जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इस्तंबुलच्या नागरी वस्तीत एक 16 मजली इमारत असून याच्या तळमजल्यावर हा नाइट क्लब होता. ही दुर्घटना असू शकते किंवा यामागे कट देखील असू शकतो. पोलीस सर्व शक्यता विचारात घेत तपास करत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली असून यात क्लबचा व्यवस्थापक आणि नुतनीकरणाच्या टीमचे सदस्य सामील असल्याची माहिती स्थानिक गव्हर्नर दावुत गुल यांनी दिली आहे.
इमारतीत ही आग फैलावल्याने अन्य मजल्यावर राहत असलेले काही लोक मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे, परंतु याबाबत अद्याप पुष्टी झालेली नाही. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून वैद्यकीय आणि पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले होते.