ठाणे : 2 दिवसांत 250 कुत्र्यांच्या चावल्याच्या घटनांची नोंद
अवघ्या दोन दिवसांत, भिवंडीतील (Bhiwandi) इंदिरा गांधी या सरकारी रूग्णालयात सुमारे 250 भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या नोंदी करण्यात आल्या.पाच वर्षांच्या रईबा शेख हिला एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने चावा (dog bite) घेतल्याने ठाण्याच्या (Thane) सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिच्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली. तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. तसेच दुसरीकडे, नऊ वर्षीय अयान शेख याच्या हातावर चाव्याच्या खुणा असल्याने त्याला दाखल करण्यात आले.रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 8 जुलै रोजी एकूण 135 आणि 7 जुलै रोजी 114 भटक्या कुत्र्यांच्या (dog) हल्ल्याची प्रकरणे आढळून आली. यात एक बालरुग्ण दाखल आहे. उर्वरितांना डिस्चार्ज देण्यात आला. आणखी तीन बालरुग्णांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.समोर आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 8 जुलैपर्यंत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात एकूण 45 कुत्रे चावल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी 25 पेक्षा जास्त मुले होती, असे रुग्णालयाच्या नोंदीमध्ये नमूद केले आहे. दरम्यान, एक दिवस अगोदर म्हणजे 7 जुलै रोजी भिवंडीतील कामत नगरमध्ये कुत्रे चावण्याच्या 60 घटना घडल्या होत्या.या कुत्रा चावण्याच्या घटनेत जखमी झालेल्यांमध्ये लहान मुले, तरुण आणि 70च्या दशकातील लोकांचा समावेश आहे. आपली भूमिका स्पष्ट करताना, भिवंडी महानगरपालिकेने सांगितले की, निविदा प्रक्रिया 2023 मध्ये सुरू झाली होती. परंतु पुरेशा निविदांचा अभाव होता. आता पुन्हा निविदा काढण्यासाठी पालिकेने परवानगी दिली आहे.हेही वाचावरळी BMW अपघातातील आरोपी मिहिर शाहला अटकअनंत-राधिकाच्या लग्नसमारंभामुळे 12 ते 15 जुलैपर्यंत मुंबईच्या ‘या’ रस्त्यांवर नो एंट्री
Home महत्वाची बातमी ठाणे : 2 दिवसांत 250 कुत्र्यांच्या चावल्याच्या घटनांची नोंद
ठाणे : 2 दिवसांत 250 कुत्र्यांच्या चावल्याच्या घटनांची नोंद
अवघ्या दोन दिवसांत, भिवंडीतील (Bhiwandi) इंदिरा गांधी या सरकारी रूग्णालयात सुमारे 250 भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या नोंदी करण्यात आल्या.
पाच वर्षांच्या रईबा शेख हिला एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने चावा (dog bite) घेतल्याने ठाण्याच्या (Thane) सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिच्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली. तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. तसेच दुसरीकडे, नऊ वर्षीय अयान शेख याच्या हातावर चाव्याच्या खुणा असल्याने त्याला दाखल करण्यात आले.
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 8 जुलै रोजी एकूण 135 आणि 7 जुलै रोजी 114 भटक्या कुत्र्यांच्या (dog) हल्ल्याची प्रकरणे आढळून आली. यात एक बालरुग्ण दाखल आहे. उर्वरितांना डिस्चार्ज देण्यात आला. आणखी तीन बालरुग्णांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
समोर आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 8 जुलैपर्यंत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात एकूण 45 कुत्रे चावल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी 25 पेक्षा जास्त मुले होती, असे रुग्णालयाच्या नोंदीमध्ये नमूद केले आहे. दरम्यान, एक दिवस अगोदर म्हणजे 7 जुलै रोजी भिवंडीतील कामत नगरमध्ये कुत्रे चावण्याच्या 60 घटना घडल्या होत्या.
या कुत्रा चावण्याच्या घटनेत जखमी झालेल्यांमध्ये लहान मुले, तरुण आणि 70च्या दशकातील लोकांचा समावेश आहे. आपली भूमिका स्पष्ट करताना, भिवंडी महानगरपालिकेने सांगितले की, निविदा प्रक्रिया 2023 मध्ये सुरू झाली होती. परंतु पुरेशा निविदांचा अभाव होता. आता पुन्हा निविदा काढण्यासाठी पालिकेने परवानगी दिली आहे.हेही वाचा
वरळी BMW अपघातातील आरोपी मिहिर शाहला अटक
अनंत-राधिकाच्या लग्नसमारंभामुळे 12 ते 15 जुलैपर्यंत मुंबईच्या ‘या’ रस्त्यांवर नो एंट्री