मंत्रीपद भोगूनही पं. समितीची इमारत उभी केली नाही हे दुर्दैव

मंत्रीपद भोगूनही पं. समितीची इमारत उभी केली नाही हे दुर्दैव

रुपेश राऊळांचे मंत्री दीपक केसरकरांवर टीकास्त्र
सावंतवाडी | प्रतिनिधी
माजी आरोग्यमंत्री भाईसाहेब सावंत यांनी मंत्री असताना आरोग्य व शैक्षणिक आणि माजी पालकमंत्री प्रवीण भोसले यांनी आरोग्य, आय. टी. आय, फलोद्यान व सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय ओरोस निर्माण केले. मात्र गेल्या पंधरा वर्षांपासून आमदार, पालकमंत्री, कॅबिनेट मंत्री होवूनही दिपक केसरकर यांनी साधी सावंतवाडी तालुका पंचायत समितीची इमारत उभी केली नाही हे दुर्दैव आहे. असे ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे पंधरा वर्षे आमदारकी व मंत्रीपद भोगूनही साधे पंचायत समितीचे तालुका इमारत उभारू शकले नाही, पंचायत समितीचा कारभार गोडाऊनच्या इमारतीमधून हाकावा लागतो, हे जनतेचे दुर्दैव असून निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा एकदा घोषणांचे पाऊस सुरू केला आहे. परंतु त्यांच्या या घोषणा केवळ पोकळ आहेत असे टीका शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केली.
श्री राऊळ यांनी आज येथील शिवसेने शाखेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, जिल्हा संघटक शब्बीर मणियार ,शहर प्रमुख शैलेश गंवडळकर, उपतालुकाप्रमुख राजू शेटकर अँड कौस्तुभ गावडे, विनोद ठाकूर,रश्मी माळवदे, प्राची राऊळ, रूपाली चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना १ मे १९८१ मध्ये झाली त्यावेळी भाईसाहेब सावंत पालकमंत्री असताना त्यांनी जिल्ह्याचा ज्या पद्धतीने विकास केला तो विकास आजपर्यंतच्या कुठल्याही मंत्र्याला करता आला नाही ते सपसेल पालकमंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. भाईसाहेब सावंत यांच्या योगदानाला प्रेरित होऊन आतापर्यंत होऊन गेलेल्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्याला सर्वांगीण विकासाकडे घेऊन जायला हवे होते परंतु त्यांच्याकडून ते झाले नाही. आमदार दीपक केसरकर यांनीही जिल्ह्याचे पालकमंत्री पद भोगले परंतु त्यांच्याकडून जनतेची निराशा झाली पंधरा वर्षे आमदार व मंत्री असूनही ते सावंतवाडी तालुक्याची पंचायत समिती इमारत उभारू शकले नाही केवळ पोकळ आश्वासने देण्यापलीकडे त्यांनी काहीच केले नाही त्यांच्या याच आश्वासनामुळे पंचायत समितीचा कारभार जिल्हा परिषदेच्या गोडाऊनमध्ये अजूनही सुरू आहे हे सर्वसामान्य जनतेचे दुर्दैव आहे.
ते म्हणाले,मुळात २०२१ मध्ये या पंचायत समितीच्या इमारतीचा आराखडा दोन कोटीचा असताना तो आज १६ कोटी वर गेला आहे. याला केसरकर जबाबदार आहेत. केवळ पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यावेळी यश न मिळाल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केला आहे आता निवडणूक जवळ आल्याने पुन्हा एकदा ते घोषणांचा पाऊस पडत आहेत परंतु त्यांच्या घोषणांना येथील जनतेने बळी पडू नये त्यांच्या घोषणा या पोकळच राहणार आहे.
श्री राऊळ पुढे म्हणाले, सावंतवाडी रेल्वे टर्मिनस च्या बाबतीतही केसरकर अपयशी ठरले आहेत. त्यांनी आंदोलक भुमिका घेतली होती.मुळात मडुरा की मळगाव अशा भांडणामध्ये या रेल्वे स्थानकाचा विकास खुंटला गेला त्यानंतर टर्मिनसचा दर्जा मिळूनही पुढे त्याचा विकास न झाल्याने केवळ टर्मिनल असून नसल्यासारखे आहे या ठिकाणी रेल्वे गाड्यांना थांबा मिळत नाही वेटिंग रूम व्यवस्थित नाहीत. डोक्यावर छप्पर नाही.या सर्व गोष्टींना केसरकरच जबाबदार आहेत.
पालकमंत्र्यांनी दखल घ्यावी..
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सावंतवाडी रेल्वे स्थानकाला टर्मिनस म्हणून पाहावे. लोक उन्हा पावसात भिजत रेल्वे मध्ये चढ उतार करतात. आता सुशोभीकरण करताना बाहेरून रंगरंगोटी आतून पोकळ ची अवस्था सावंतवाडी टर्मिनस ची आहे टर्मिनस चा दर्जा मिळू नये या ठिकाणी रेल्वे गाड्यांना थांबा नाही वेटिंग रूम तसेच प्रवाशांना शुभेच्छा सुविधा नाहीत तुतारी सारखी गाडी प्लॅटफॉर्म दोन वर लागते त्यामुळे वयोवृद्ध व्यक्तींना एक किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी जाणे येणे त्रासदायक ठरते ती गाडी प्लॅटफॉर्म एक वर लागणे गरजेचे आहे. त्यामुळे या सर्व समस्यांची दखल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घ्यावी असे आवाहनही यावेळी रुपेश राऊळ यांनी केले.