अमेरिकेमध्ये वादळात 18 लोकांचा मृत्यू, तर 100 पेक्षा जास्त घर उध्वस्त

अमेरिकेमध्ये वादळात 18 लोकांचा मृत्यू, तर 100 पेक्षा जास्त घर उध्वस्त

मध्य अमेरिकेच्या टेकसास, ओक्लाहोमा आणि अर्कांसस राज्यांमध्ये आलेल्या भयंकर वादळामुळे 2 लहान मुलांसोबत कमीतकमी 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक घरे वादळामुळे उध्वस्त झाले आहे. तसेच वाढत्या तापमानात हजारो लोकांना विना विजेशिवाय राहावे लागत आहे. या वादळात 100 पेक्षा जास्त घरे उध्वस्त झाली आहे. तर 100 लोक जखमी झाले आहे. 

 

ह्यूस्टन कडून मिळालेल्या माहितीमध्ये अधिकारींनी सांगितले की, ओक्लाहोमा सीमेजवळ टेकसासच्या कुक काउंटीमध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळावी आहे. जिथे शनिवारी एका भयंकर वादळाने ग्रामीण भागात दैनंदिन जीवन उद्धवस्त केले आहे. कुक काउंटी चे शेरिफ रे सैपपिंग्टन म्हणाले की, इथे फक्त मलबाचा ढीग आहे. खूप नुकसान झाले आहे. 

 

शोध मोहीम अजून पर्यंत सुरु- 

शेरिफने सांगितले की, मृतांमध्ये 2 लहान मुले देखील आहे. ज्यांचे वय फक्त 2 आणि 5 वर्ष आहे. एका कुटुंबातील 3 सदस्यांचा या वादळामुळे मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढू शकते कारण या वादळात बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सुरु आहे. 

 

100 पेक्षा जास्त घरे उध्वस्त, 100 लोक जखमी 

सीबीएस न्यूज बातमी नुसार टेकसासचे गव्हर्नर ग्रेग एबॉट यांनी रविवारी सांगितले की, शनिवारी आलेल्या या वादळाने कमीतकमी 100 लोक जखमी झाले आहेत. तर 100 पेक्षा जास्त घरे उध्वस्त झाली आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source