यल्लम्मा यात्रेसाठी धावल्या 15 बसेस
डोंगरावर गर्दी, यात्रा विशेष बसेस सुसाट
बेळगाव : बेळगाव-सौंदत्ती मार्गावर यात्रेसाठी विशेष जादा बस सोडण्यात आल्या आहेत. मंगळवारी मध्यवर्ती बसस्थानकातून 15 हून अधिक बस या मार्गावर धावल्या. तर यात्रेसाठी बुकिंग केलेल्या बसेसची संख्याही वाढली आहे. त्यामुळे यल्लम्मा यात्रेसाठी विशेष बस सुसाट धावू लागल्या आहेत. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती यल्लम्मा यात्रेसाठी भाविक दाखल होऊ लागले आहेत. दरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने या मार्गावर अतिरिक्त बस सोडल्या आहेत. या बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. सोमवारी पहिल्या दिवशी काही मोजक्याच बस सौंदत्तीकडे धावल्या. मात्र मंगळवारी 15 हून अधिक बस सौंदत्तीच्या दिशेने धावल्या. गुरुवार दि. 25 रोजी शाकंभरी पौर्णिमा आहे. या दिवशी सौंदत्ती डोंगरावर भाविकांची गर्दी होणार आहे. त्यामुळे 31 जानेवारीपर्यंत विशेष बस धावणार आहेत. यल्लम्मा यात्रेसाठी परिवहनने 30 बसेसची तजवीज केली आहे. प्रवाशांच्या संख्येनुसार बसेस सोडल्या जात आहेत. काही गावांतील भक्तांनी बसेस बुक केल्या आहेत. तर काहीजण बसस्थानकात येऊन बेळगाव-सौंदत्ती बसने प्रवास करीत आहेत. विशेषत: शक्ती योजनेंतर्गत महिलांना मोफत प्रवास दिला जात आहे. बेळगाव-सौंदत्ती फुल्ल तिकीट दर 125 तर हाफ तिकीट 65 रुपये आकारले जात आहे. यामध्ये महिलांना मात्र शक्ती योजनेंतर्गत मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे.
Home महत्वाची बातमी यल्लम्मा यात्रेसाठी धावल्या 15 बसेस
यल्लम्मा यात्रेसाठी धावल्या 15 बसेस
डोंगरावर गर्दी, यात्रा विशेष बसेस सुसाट बेळगाव : बेळगाव-सौंदत्ती मार्गावर यात्रेसाठी विशेष जादा बस सोडण्यात आल्या आहेत. मंगळवारी मध्यवर्ती बसस्थानकातून 15 हून अधिक बस या मार्गावर धावल्या. तर यात्रेसाठी बुकिंग केलेल्या बसेसची संख्याही वाढली आहे. त्यामुळे यल्लम्मा यात्रेसाठी विशेष बस सुसाट धावू लागल्या आहेत. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती यल्लम्मा यात्रेसाठी भाविक दाखल होऊ लागले […]
