वकिलांना मिळणाऱ्या गौरवधनाची नोंद ऑनलाईनद्वारे

ज्युनिअर वकिलांचा वेळ-खर्च वाचणार बेळगाव : ज्युनिअर वकिलांना महिन्याला गौरवधन दिले जाते. त्यासाठी त्याची नोंद करण्यासाठी आपल्या तालुक्यामध्ये जावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि खर्चदेखील वाया जात होता. मात्र आता ऑनलाईन पद्धतीने त्याची नोंद करण्याची मुभा दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. अहिंद वकील संघटनेतर्फे समाज कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन विविध मागण्या केल्या असता सदर […]

वकिलांना मिळणाऱ्या गौरवधनाची नोंद ऑनलाईनद्वारे

ज्युनिअर वकिलांचा वेळ-खर्च वाचणार
बेळगाव : ज्युनिअर वकिलांना महिन्याला गौरवधन दिले जाते. त्यासाठी त्याची नोंद करण्यासाठी आपल्या तालुक्यामध्ये जावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि खर्चदेखील वाया जात होता. मात्र आता ऑनलाईन पद्धतीने त्याची नोंद करण्याची मुभा दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. अहिंद वकील संघटनेतर्फे समाज कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन विविध मागण्या केल्या असता सदर माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या वकिलांना सरकारकडून विविध योजना लागू आहेत. त्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे अनेकजण या योजनांपासून वंचित आहेत. तेव्हा तातडीने त्यासाठी पाऊल उचलावे, अशी मागणी करण्यात आली. कार्यालय उघडण्यासाठी 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. ती देखील देण्यास टाळाटाळ सुरू आहे. महापालिकेतून अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव निधी खर्च करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. अनुसूचित जाती-जमातीचा निधी इतरत्र वळविला जात आहे. त्यामुळे त्या समाजावर अन्याय होत आहे. तेव्हा अनुसूचित जाती-जमातीचा निधी त्यासाठीच खर्च करावा, अशी मागणीही करण्यात आली. समाज कल्याण खात्याचे संयुक्त संचालक बबली यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अॅड. एन. आर. लातूर, अॅड. एम. व्ही. पाटील, अॅड. विनोद पाटील, अॅड. निंगाप्पा मास्ती, अॅड. यशवंत लमाणी, अॅड. रेणुका राज, अॅड. चेतन हेगडे, अॅड. के. के. यादगुडे आदी उपस्थित होते.