बारावी परीक्षेचा आज निकाल
बेंगळूर : बारावी वार्षिक परीक्षा-1 चा निकाल बुधवार 10 एप्रिल रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे. कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली आहे. सकाळी 11 वाजता बेंगळुरात पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर पदवीपूर्व शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध केला जाणार आहे राज्यात 2023-24 या शैक्षणिक वर्षातील बारावीची वार्षिक परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. सर्व विषयांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन 5 एप्रिल रोजी पूर्ण झाले असून परीक्षेचा निकाल बुधवारी सकाळी https:// karresults.nic.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल. बारावी वार्षिक परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण 6,98,627 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 3,30,644 मुले आणि 3,67,980 मुली परीक्षेला बसल्या होत्या. 25 मार्चपासूनच मूल्यमापन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आता मूल्यमापन प्रक्रिया संपली असून गुणांचे संगणकीकरण करण्यात आले आहे.
Home महत्वाची बातमी बारावी परीक्षेचा आज निकाल
बारावी परीक्षेचा आज निकाल
बेंगळूर : बारावी वार्षिक परीक्षा-1 चा निकाल बुधवार 10 एप्रिल रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे. कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली आहे. सकाळी 11 वाजता बेंगळुरात पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर पदवीपूर्व शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध केला जाणार आहे राज्यात 2023-24 या शैक्षणिक वर्षातील बारावीची वार्षिक […]