कृष्णा नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू
विजापूर जिल्ह्यातील कोल्हारजवळील दुर्घटना
वार्ताहर /विजापूर
उगादी अमावस्येला देवाची पालखी घेऊन नदीत स्नान करण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाला. सदर घटना विजापूर जिह्यातील कोल्हारजवळील कृष्णा नदीत घडली. कारजोळ गावातील सुदीप (पप्पू) दो•मणी (वय 12) आणि श्रीधर दो•मणी (वय 10) अशी सदर मुलांची नावे आहेत. युगादी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर कारजोळ गावात हुचम्मा देवीची जत्रा होती. देवीची पालखी वाहून स्नान करण्यासाठी कारजोळ गावातून ग्रामस्थ कृष्णा नदीवर गेले होते. दोन्ही मुले आई-वडिलांसोबत नदीवर गेली असताना ही दुर्घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेची नोंद कोल्हार पोलीस ठाण्यात झाली आहे.
Home महत्वाची बातमी कृष्णा नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू
कृष्णा नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू
विजापूर जिल्ह्यातील कोल्हारजवळील दुर्घटना वार्ताहर /विजापूर उगादी अमावस्येला देवाची पालखी घेऊन नदीत स्नान करण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाला. सदर घटना विजापूर जिह्यातील कोल्हारजवळील कृष्णा नदीत घडली. कारजोळ गावातील सुदीप (पप्पू) दो•मणी (वय 12) आणि श्रीधर दो•मणी (वय 10) अशी सदर मुलांची नावे आहेत. युगादी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर कारजोळ गावात हुचम्मा देवीची जत्रा होती. देवीची पालखी […]