‘बजाज’ची जगातील पहिली सीएनजी दुचाकी लाँच

सीएनजी दुचाकी फ्रीडम-125 चा समावेश : 1 रुपयात 1 किमी धावणार  : किंमत 95,000 पासून सुरु वृत्तसंस्था / नवी दिल्ली बजाज ऑटोने जगातील पहिली सीएनजी मोटरसायकल ‘बजाज फ्रीडम 125’ लाँच केली. ही बाईक सीएनजी आणि पेट्रोल या दोन्ही इंधनावर चालणार आहे. रायडरला जे इंधन चालवायचे आहे त्यासाठी बटन दाबून सीएनजी आणि पेट्रोल दरम्यान स्विच करण्याची […]

‘बजाज’ची जगातील पहिली सीएनजी दुचाकी लाँच

सीएनजी दुचाकी फ्रीडम-125 चा समावेश : 1 रुपयात 1 किमी धावणार  : किंमत 95,000 पासून सुरु
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बजाज ऑटोने जगातील पहिली सीएनजी मोटरसायकल ‘बजाज फ्रीडम 125’ लाँच केली. ही बाईक सीएनजी आणि पेट्रोल या दोन्ही इंधनावर चालणार आहे. रायडरला जे इंधन चालवायचे आहे त्यासाठी बटन दाबून सीएनजी आणि पेट्रोल दरम्यान स्विच करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या दुचाकीची सुरुवातीची किंमत 95,000 रुपये आहे. यामध्ये 2 लिटर पेट्रोलची टाकी आणि 2 किलोची सीएनजीची टाकी आहे. दोन्ही इंधनावर ही बाईक 330 किमी धावेल असा कंपनीचा दावा आहे. बाईकच्या 11 पेक्षा जास्त सुरक्षा चाचण्या झाल्या आहेत. 10 टन भरलेला ट्रकच्या खाली गाडी आली तरीही टाकीचा स्फोट झाला नाही.
बजाज वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये सीएनजी बाइक्सही लॉन्च करणार आहे
बजाज ऑटोचे एमडी राजीव बजाज म्हणाले, ‘पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमध्ये कंपनी सीएनजी मॉडेलसह जास्तीत जास्त ग्राहकांना आगामी काळात लक्ष्य करेल. ते प्रथम महाराष्ट्रात आणि नंतर सीएनजी स्टेशन उपलब्ध असलेल्या राज्यांमध्ये सुरू केले जाईल.’ बजाज म्हणतात, ‘आम्ही सीएनजी बाइक्सचा एक पोर्टफोलिओ तयार करू, ज्यामध्ये 100सीसी, 125सीसी आणि 150-160सीसी दुचाकींचा समावेश राहणार आहे.
राजीव यांनी नवीन प्रकल्पाबद्दल सांगितले की, प्रोटोटाइपच्या चाचणी दरम्यान, पेट्रोल बाईकच्या तुलनेत कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन 50 टक्के, कार्बन मोनोऑक्साइड 75 टक्के आणि नॉन-मिथेन हायड्रोकार्बन उत्सर्जन सुमारे 90 टक्के कमी झाले आहे.