सौरभ कोठारी स्नूकर विजेता
वृत्तसंस्था/ चेन्नई
येथे झालेल्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेचे अजिंक्यपद पीएसपीबीच्या सौरभ कोठारीने पटकाविले. वरिष्ठ राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतील कोठारीचे हे पहिले जेतेपद आहे. त्याने या स्पर्धेत राष्ट्रीय वरिष्ठ 15-रेड स्नूकरचे जेतेपद पटकाविले.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात कोठारीने आरएसपीबीच्या पारस गुप्ताचा 6-2 अशा फ्रेम्समध्ये पराभव केला. कोठारीने ही अंतिम लढत 58-46, 72-34, 0-64, 59-25, 61-54, 21-57, 64-8, 64-25 अशी जिंकली. गेल्या महिन्यात डोहा येथे झालेल्या विश्व बिलियर्ड्स स्पर्धेत कोठारीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
Home महत्वाची बातमी सौरभ कोठारी स्नूकर विजेता
सौरभ कोठारी स्नूकर विजेता
वृत्तसंस्था/ चेन्नई येथे झालेल्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेचे अजिंक्यपद पीएसपीबीच्या सौरभ कोठारीने पटकाविले. वरिष्ठ राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतील कोठारीचे हे पहिले जेतेपद आहे. त्याने या स्पर्धेत राष्ट्रीय वरिष्ठ 15-रेड स्नूकरचे जेतेपद पटकाविले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात कोठारीने आरएसपीबीच्या पारस गुप्ताचा 6-2 अशा फ्रेम्समध्ये पराभव केला. कोठारीने ही अंतिम लढत 58-46, 72-34, 0-64, 59-25, 61-54, 21-57, 64-8, […]