विभव कुमारला न्यायालयाचा झटका
केजरीवालांच्या खासगी सचिवाची जामीन याचिका फेटाळली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तुरुंगात कैद दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार यांची जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. विभव कुमार यांच्यावर आम आदमी पक्षाच्या खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष स्वाती मालिवाल यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. मुख्यमंत्री केजरीवालांच्या निवासस्थानी मारहाणीचा प्रकार घडला होता.
दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आल्यावर विभव कुमारने तीस हजारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने यावर सुनावणी करत जामीन याचिका फेटाळली आहे. यामुळे केजरीवालांचे निकटवर्तीय असलेल्या विभव कुमारचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.
दिल्ली पोलिसांनी केजरीवालांच्या निवासस्थानातूनच विभव कुमारला अटक केली होती. मुख्यमंत्री केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्यावर तेथे विभव कुमारने मारहाण केल्याचा आरोप मालिवाल यांनी केला आहे. याप्रकरणी आप खासदार संजय सिंह यांनी केजरीवाल यांनी दखल घेतली असून संबंधितावर कारवाई केली जाईल असे म्हटले होते, परंतु घटनेच्या काही दिवसांनी आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी मालिवाल यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यास सुरुवात केली होती.
Home महत्वाची बातमी विभव कुमारला न्यायालयाचा झटका
विभव कुमारला न्यायालयाचा झटका
केजरीवालांच्या खासगी सचिवाची जामीन याचिका फेटाळली वृत्तसंस्था/ नवी दिल्ली तुरुंगात कैद दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार यांची जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. विभव कुमार यांच्यावर आम आदमी पक्षाच्या खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष स्वाती मालिवाल यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. मुख्यमंत्री केजरीवालांच्या निवासस्थानी मारहाणीचा प्रकार घडला होता. दिल्ली पोलिसांकडून […]