बांधकाम क्षेत्रात 7 कोटी जणांना रोजगार

जीडीपीतही क्षेत्राचे योगदान नोंदणीय : अनारॉक, नारडेकोच्या अहवालात माहिती वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2013 मध्ये चार कोटी इतकी असणारी रोजगाराची संख्या बांधकाम क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत 7 कोटी 10 लाख इतकी झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळातील विविध लाभकारक धोरणांमुळे बांधकाम क्षेत्राला गती घेता आली आहे. यातूनच या क्षेत्रात रोजगार क्षमतेत वाढ होऊ […]

बांधकाम क्षेत्रात 7 कोटी जणांना रोजगार

जीडीपीतही क्षेत्राचे योगदान नोंदणीय : अनारॉक, नारडेकोच्या अहवालात माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2013 मध्ये चार कोटी इतकी असणारी रोजगाराची संख्या बांधकाम क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत 7 कोटी 10 लाख इतकी झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळातील विविध लाभकारक धोरणांमुळे बांधकाम क्षेत्राला गती घेता आली आहे. यातूनच या क्षेत्रात रोजगार क्षमतेत वाढ होऊ शकली आहे.
बांधकाम क्षेत्रातील सल्लागार कंपनी अनारॉक त्याचप्रमाणे बांधकाम क्षेत्राचे मंडळ नारडेको यांच्या संयुक्त अहवालामध्ये बांधकाम क्षेत्रातील रोजगार प्राप्त कर्मचाऱ्यांची संख्या समोर आली आहे. देशामध्ये रोजगार देण्यामध्ये बांधकाम क्षेत्राचा वाटा हा 18 टक्के इतका राहिला आहे. वर्ष 2014 आणि 2023 मध्ये आघाडीवरच्या 7 शहरांमध्ये 29.32 लाख घरांचा पुरवठा झाला असून 28 लाख 27 हजार घरांची विक्री यादरम्यान झाली आहे.
 धोरण, योजनांचा लाभ
रियल इस्टेट रेग्युलेरिटी अॅक्ट अर्थात रेरा, जीएसटी त्याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजना अशा योजनांच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्राला गेल्या 10 वर्षांमध्ये विकसित होण्यामध्ये मोठे पाठबळ मिळाले आहे. 2013 मध्ये 4 कोटी इतकी असणारी या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या आता जवळपास सात कोटी दहा लाखांवर पोहोचली आहे.
रोजगार देणारे दुसरे मोठे क्षेत्र
देशाच्या जीडीपीमध्ये बांधकाम क्षेत्राचा वाटा हा 2017 पर्यंत सहा ते आठ टक्के आहे. 2025 पर्यंत 13 टक्के जीडीपी राहू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. कृषी क्षेत्रानंतर बांधकाम क्षेत्र हे सर्वात मोठे रोजगार देणारे क्षेत्र ठरले आहे.