काश्मीरच्या सुरक्षेसंबंधी आज आढावा बैठक
गृहमंत्र्यांसह अजित डोवाल यांची उपस्थिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गृहमंत्री अमित शाह मंगळवारी दिल्लीत जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, मुख्य सचिव अटल दुल्लू आणि डीजीपी आर. आर. स्वेन यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. यामध्ये केंद्रशासित प्रदेशातील विकासकामांसह अलीकडच्या दहशतवादी घटना आणि सुरक्षा दलांच्या कारवायांवर चर्चा केली जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक तपन डेका, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलाचे पोलीस महासंचालक, तसेच गृह मंत्रालय आणि जम्मूचे संबंधित अधिकारीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसात दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. सीमापार घुसखोरीचे प्रमाणही वाढले असून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Home महत्वाची बातमी काश्मीरच्या सुरक्षेसंबंधी आज आढावा बैठक
काश्मीरच्या सुरक्षेसंबंधी आज आढावा बैठक
गृहमंत्र्यांसह अजित डोवाल यांची उपस्थिती वृत्तसंस्था/ नवी दिल्ली गृहमंत्री अमित शाह मंगळवारी दिल्लीत जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, मुख्य सचिव अटल दुल्लू आणि डीजीपी आर. आर. स्वेन यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. यामध्ये केंद्रशासित प्रदेशातील विकासकामांसह अलीकडच्या दहशतवादी घटना आणि सुरक्षा दलांच्या कारवायांवर चर्चा केली जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, […]
