ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. वनडे मालिकेसाठी भारतीय संघामध्ये श्रेयांका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक व तितास साधू या नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 28 डिसेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्रारंभ होत आहे. भारतीय निवड समितीने या दोन मालिकांसाठी स्वतंत्र संघ घोषित केले असून हरमनप्रित कौरकडे कर्णधारपद सोपविले आहे. पतियाळाची 20 वर्षीय डावखुरी फिरकी गोलंदाज मन्नत कश्यपला संघात संधी मिळाली आहे. मन्नतचा यापूर्वी इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला होता पण तिला एकही सामना खेळण्याची संधी मिळू शकली नाही. मात्र श्रेयांका पाटीलला वनडेमध्य पदार्पणची संधी मिळेल. तिने या महिन्यांच्या प्रारंभी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत टी-20 मध्ये पदार्पण केले होते. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यात श्रेयांका पाटीलने 5 गडी बाद करुन सामनावीराचा बहुमान मिळविला होता.
गेल्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या यू-19 महिलांच्या विश्वचषक टी-20 स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविणाऱ्या भारतीय महिला संघामध्ये मन्नत कश्यपचा समावेश होता. त्याचप्रमाणे या संघात तितास साधूचाही सहभाग होता. यावर्षी झालेल्या महिलांच्या पहिल्या प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या मुंबई इंडियन्स संघातील सायका इशाक ही एक उत्तम गोलंदाज म्हणून ओळखली गेली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील तीन सामन्यांची वनडे मालिका मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 28, दुसरा सामना 30 डिसेंबर तर तिसरा सामना 2 जानेवारीला होणार आहे. या मालिकेनंतर उभय संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका नव्या मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर आयोजित केली आहे. या मालिकेतील सामने 5, 7, 9 जानेवारीला होणार आहेत. या दोन्ही मालिकांसाठी हरमनप्रित कौर कर्णधार तर स्मृती मानधना उपकर्णधार म्हणून राहिल. अलिकडेच भारतीय महिला क्रिकेट संघाने मुंबईत एकमेव कसोटीमध्ये बलाढ्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत नवा इतिहास रचला होता.
भारतीय महिला संघ (वनडे) : हरमनप्रित कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमीमा रॉड्रीग्स, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटीया, रिचा घोष, अमनजोत कौर, श्रेयांका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुकासिंग ठाकूर, तितास साधू, पूजा वस्त्रकार, स्नेह राणा आणि हर्लिन देओल.
भारतीय महिला संघ (टी-20) : हरमनप्रित कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमीमा रॉड्रीग्स, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटीया, रिचा घोष, अमनजोत कौर, श्रेयांका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुकासिंग ठाकूर, तितास साधू, पूजा वस्त्रकार, कनिका आहुजा आणि मिन्नू मणी.
Home महत्वाची बातमी ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर
ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. वनडे मालिकेसाठी भारतीय संघामध्ये श्रेयांका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक व तितास साधू या नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 28 डिसेंबरपासून मुंबईच्या वानखेडे […]