दूध उत्पादकांचे शुन्य शिल्लकेवर जिल्हा बँकेत खाते :गोकुळ अध्यक्ष अरुण डोंगळे यांची माहिती

जिल्हा बँकेकडून गोकुळची मागणी मान्य कोल्हापूर प्रतिनिधी राज्य शासनाने सहकारी दूध संस्थामार्फत गाय दूध पुरवठा करण्राया दूध उत्पादकांना प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्यासाठी उत्पादकांची बँकेत खाती असणे अनिवार्य केले असून ज्या दुध उत्पादकांची बँक खाती नाहीत अश्या उत्पादकांची शून्य शिल्लक रक्कमेवर जिल्हा बँकेत खाती उघडून द्यावीत ही गोकुळने बँकेला केलेली विनंती मान्य केल्याची माहिती गोकुळचे […]

दूध उत्पादकांचे शुन्य शिल्लकेवर जिल्हा बँकेत खाते :गोकुळ अध्यक्ष अरुण डोंगळे यांची माहिती

जिल्हा बँकेकडून गोकुळची मागणी मान्य
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्य शासनाने सहकारी दूध संस्थामार्फत गाय दूध पुरवठा करण्राया दूध उत्पादकांना प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्यासाठी उत्पादकांची बँकेत खाती असणे अनिवार्य केले असून ज्या दुध उत्पादकांची बँक खाती नाहीत अश्या उत्पादकांची शून्य शिल्लक रक्कमेवर जिल्हा बँकेत खाती उघडून द्यावीत ही गोकुळने बँकेला केलेली विनंती मान्य केल्याची माहिती गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली.
पत्रकात म्हटले आहे, गाय दूध उत्पादकांची दर दहा दिवसाची दूध बिले दूधसंस्थांनी रोख देण्याऐवजी त्यांच्या बँक खात्यावर जमा करणे हे प्रतिलिटर पाच रुपये अनुदानासाठी बंधनकारक असल्याची अट शासनाच्या दुग्ध विकास विभागाने घातलेली आहे. त्यासाठी जिह्यातील गाय दूध उत्पादकांना बँकेत खाते उघडावे लागणार आहे. जिल्हा बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी एक हजार रुपये अनामत भरावी लागते. गोकुळच्या दूध उत्पादकांची बँक खाती शून्य शिल्लकेवर उघडून देण्याची मागणी गोकुळने जिल्हा बँकेकडे केली होती.
बँकेचे दूध संस्था गटाचे संचालक यशवंत उर्फ भैय्या माने यांनी या मागणीची दखल घेऊन बँकेचे अध्यक्ष पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि कार्यकारी व्यवस्थापक जी.एम. शिंदे यांच्याकडून ही मागणी मान्य करून दिली आहे.गोकुळच्या जिह्यातील दूध संस्थांच्या दूध उत्पादकांनी जिल्हा बँकेच्या नजीकच्या शाखेत शून्य शिल्लकेवर आपले बँक खाते उघडून द्यावी जेणेकरून शासनाचे प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाचा लाभ घेता येईल असे आवाहन गोकुळचे अध्यक्ष डोंगळे यांनी केले आहे.