झेका अश्रफ यांचा राजीनामा

वृत्तसंस्था/ लाहोर पाक क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) क्रिकेट व्यवस्थापन समितीचे चेअरमन झेका अश्रफ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे पीसीबीच्या प्रवक्त्याने सांगितले. दोन आठवड्यापूर्वीच अश्रफ यांनी चेअरमनपदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले होते. त्यांचा चेअरमनपदाचा कालावधी अद्याप दोन आठवडे बाकी होता. लाहोरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये अश्रफ यांनी आपल्या पदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. अलीकडेच पाक क्रिकेट संघाची कामगिरी […]

झेका अश्रफ यांचा राजीनामा

वृत्तसंस्था/ लाहोर
पाक क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) क्रिकेट व्यवस्थापन समितीचे चेअरमन झेका अश्रफ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे पीसीबीच्या प्रवक्त्याने सांगितले.
दोन आठवड्यापूर्वीच अश्रफ यांनी चेअरमनपदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले होते. त्यांचा चेअरमनपदाचा कालावधी अद्याप दोन आठवडे बाकी होता. लाहोरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये अश्रफ यांनी आपल्या पदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. अलीकडेच पाक क्रिकेट संघाची कामगिरी असमाधानकारक होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. आशिया चषक आणि त्यानंतर भारतात झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाक संघाची कामगिरी निकृष्ट झाली होती. दरम्यान न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या टी-20 मालिकेत पाकला सलग चार सामने गमवावे लागले आहेत.