झील मेहता करणार विवाह
‘तारक मेहता’मधील सोनू
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या टीव्ही मालिकेतील सोनू म्हणजेच झील मेहता आता विवाहबद्ध होणार आहे. या शोमध्ये आत्माराम भिडेची छोटी मुलगी सोनू भिडेची भूमिका साकारलेली झील आता संसार थाटणार आहे. सोशल मीडियावर सक्रीय झीलने मॅरेज प्रपोजलचा व्हिडिओ शेअर केला आहे.
‘कोई मिल गया मेरा दिल गया’ अशी कॅप्शन तिने या व्हिडिओला दिली आहे. या व्हिडिओत काही मित्र झीलच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तिला स्टेजवर आणत असल्याचे आणि मग तिचा प्रियकर आदित्य दुबे तिला प्रपोज करत असल्याचे दिसून येते. झीलने त्याचे हे प्रपोजल स्वीकारले आहे.
‘तारक मेहता’चा जुना टप्पू म्हणजेच भव्य गांधीने झीलच्या या व्हिडिओवर कॉमेंट केली आहे. तर काही जणांनी आत्माराम तुकाराम भिडे या व्यक्तिरेखेच्या क्लिप्स शेअर केल्या आहेत. झील सध्या 28 वर्षांची आहे. तारक मेहतामधील तिच्या अभिनयाला मोठी पसंती मिळाली होती. झील सध्या अभिनयाच्या क्षेत्रात सक्रीय नसली तरीही तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे.
Home महत्वाची बातमी झील मेहता करणार विवाह
झील मेहता करणार विवाह
‘तारक मेहता’मधील सोनू ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या टीव्ही मालिकेतील सोनू म्हणजेच झील मेहता आता विवाहबद्ध होणार आहे. या शोमध्ये आत्माराम भिडेची छोटी मुलगी सोनू भिडेची भूमिका साकारलेली झील आता संसार थाटणार आहे. सोशल मीडियावर सक्रीय झीलने मॅरेज प्रपोजलचा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘कोई मिल गया मेरा दिल गया’ अशी कॅप्शन तिने या व्हिडिओला […]