युवराज सिंगही वर्ल्डकपचा ब्रँड अॅम्बेसिडर

वृत्तसंस्था/ मुंबई आगामी टी 20 विश्वचषक 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून घोषणा केली आहे. 1 जून ते 29 जून या काळात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या वर्ल्डकपचे पूर्ण वेळापत्रक आधीच प्रसिद्ध झाले आहे. दोनच दिवसापूर्वी आयसीसीने […]

युवराज सिंगही वर्ल्डकपचा ब्रँड अॅम्बेसिडर

वृत्तसंस्था/ मुंबई
आगामी टी 20 विश्वचषक 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून घोषणा केली आहे. 1 जून ते 29 जून या काळात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या वर्ल्डकपचे पूर्ण वेळापत्रक आधीच प्रसिद्ध झाले आहे. दोनच दिवसापूर्वी आयसीसीने जमैकाचा महान धावपटू उसेन बोल्टची ब्रँड अॅम्बेसिडरपदी नियुक्ती केली होती. यानंतर आयसीसीने युवराजच्या नावाची घोषणा केली आहे.
दरम्यान, आयसीसीच्या या घोषणेनंतर युवराज म्हणाला, माझ्याकडे टी 20 विश्वचषकातील काही चांगल्या आठवणी आहेत, ज्यात एका षटकात 6 षटकार मारल्याचा समावेश आहे, त्यामुळे याचा भाग होणे खूप रोमांचक आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा कार्यक्रम असेल. त्याचा एक भाग होणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. न्यूयॉर्कमध्ये रंगणारा भारत-पाकिस्तान सामना या वर्षीच्या जगातील सर्वात मोठ्या सामन्यांपैकी एक असणार आहे, त्यामुळे त्याचा भाग होणं आणि जगातील सर्वोत्तम खेळाडूंना एका नवीन स्टेडियममध्ये खेळताना पाहणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असल्याचे तो म्हणाला.