युकी भांब्री दुहेरीत उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था/ दुबई एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या दुबई ड्युटी फ्री पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या युकी भांब्रीने दुहेरीमध्ये रॉबिन हाससमवेत उपांत्य फेरी गाठली आहे. एटीपी टूरवरील या 500 दर्जाच्या स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत युकी भांब्री आणि हॉलंडचा रॉबिन हास यांनी जेमी मरे आणि मायकेल व्हिनस यांचा 6-4, 7-6(7-1) असा पराभव केला. भांब्री […]

युकी भांब्री दुहेरीत उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था/ दुबई
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या दुबई ड्युटी फ्री पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या युकी भांब्रीने दुहेरीमध्ये रॉबिन हाससमवेत उपांत्य फेरी गाठली आहे.
एटीपी टूरवरील या 500 दर्जाच्या स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत युकी भांब्री आणि हॉलंडचा रॉबिन हास यांनी जेमी मरे आणि मायकेल व्हिनस यांचा 6-4, 7-6(7-1) असा पराभव केला. भांब्री आणि हास यांचा उपांत्य फेरीचा सामना क्रोएशियाचा डोडीग आणि अमेरिकेचा क्रेजिसेक यांच्याशी होणार आहे. भारताच्या रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार एब्डन यांना मात्र हार पत्करावी लागली. उरुग्वेच्या बेहर आणि झेकच्या पॅव्हेलसेक यांनी बोपण्णा आणि एब्डन यांचा 3-6, 6-3, 10-8 असा पराभव केला.