मोमोज खात असताना तरुणाची गोळ्या झाडून हत्या
युपीच्या नोएडा मध्ये एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नोएडा सेक्टर 137 मेट्रो स्टेशनच्या खाली ही घटना घडली आहे. तरुण मोमोज खाऊन वॉशरूमला जात असताना त्याच्यावर गोळ्या झाडण्या आल्या.या मध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रकरणाची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालमत्तेवरून ही हत्या केल्याचे कारण समोर आले आहे. संपत्तीवरून दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरु होता. हा वाद कायमचा संपवण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले नंतर तरुणावर दुसऱ्या पक्षाच्या तरुणाने गोळीबार केला.
या हल्ल्यात नवेंद्र नावाच्या एका तरुणाला डोक्यात गोळी लागली नवेंद्र हा मोमोज खात होता आणि वॉशरूम जाण्यासाठी निघाला होता.त्याला गोळी झाडली. नवेंद्रला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले. पोलिसांनी नवेंद्रचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे.
आरोपींची ओळख पटली असून दोन्ही पक्षात मालमत्तेला घेऊन वाद सुरु होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे 6 पथक तयार करण्यात आले आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल असे सांगण्यात आले आहे.
Edited by – Priya Dixit