विमानाने शिक्षणासाठी जाणारा युवक

687 किलोमीटरचा आहे प्रवास, तरीही स्वस्त शाळा किंवा महाविद्यालयात जाण्यासाठी सर्व विद्यार्थी अंतर आणि स्थितीनुसार साधनाची निवड करतात. काही लोक स्वत:च्या वाहनांनी कॉलेजला जातात, तर काही जण सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करतात. परंतु आजवर कुणी विमानाने प्रवास करत शिकण्यासाठी जात असल्याचे तुम्ही ऐकले नसेल. परंतु एक मुलगा विमानानेच कॉलेजला जात आहे. कॅनडात राहणाऱ्या या मुलाने […]

विमानाने शिक्षणासाठी जाणारा युवक

687 किलोमीटरचा आहे प्रवास, तरीही स्वस्त
शाळा किंवा महाविद्यालयात जाण्यासाठी सर्व विद्यार्थी अंतर आणि स्थितीनुसार साधनाची निवड करतात. काही लोक स्वत:च्या वाहनांनी कॉलेजला जातात, तर काही जण सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करतात. परंतु आजवर कुणी विमानाने प्रवास करत शिकण्यासाठी जात असल्याचे तुम्ही ऐकले नसेल. परंतु एक मुलगा विमानानेच कॉलेजला जात आहे.
कॅनडात राहणाऱ्या या मुलाने आपण कॉलेजला जाण्यासाठी नियमित स्वरुपात विमानाची निवड करत असल्याचे सांगितले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यामुळे त्याचा खर्च वाढत नाही, उलट त्याच्यासाठी विमानप्रवास स्वस्त ठरतो.
कलगरी ते व्हँकुअर हा 687 किलोमीटरचा प्रवास आहे. हा प्रवास विमानाद्वारे केवळ एका तासात पूर्ण होतो. हा विद्यार्थी आठवड्यात दोनवेळा कॉलेजला जातो आणि याकरता त्याला लवकर उठून विमानतळावर पोहोचावे लागते. व्हँकुअरमध्ये राहण्यापेक्षा आठवड्यातून दोनवेळा विमानप्रवास करत वर्गात हजर राहणे माझ्यासाठी स्वस्त आहे. स्वत:च्या या स्मार्ट योजनेमुळे मी चांगली बचतही केली असल्याचे त्याचे सांगणे आहे.
व्हँकुअरमध्ये राहून एका खोलीचे अपार्टमेंट भाड्याने घेतले असते तर यासाठी 2500 डॉलर्सचा खर्च करावा लागला असता. म्हणजेच 2 लाख 08 हजार 751 रुपये खर्च करावे लागले असते. तर विमानाने राउंड ट्रिप 150 डॉलर्स म्हणजेच 12,525 रुपये खर्च करावे लागतात. महिन्यात 8 वेळा प्रवास करण्यासाठी एकूण 1200 डॉलर्स म्हणजेच 1 लाख 200 रुपये खर्च करावे लागतात. अशा स्थितीत तासाभराच्या फ्लाइटद्वारे थेट 75 हजार रुपये वाचत आहेत, याचबरोबर घरात राहता येत असल्याचे या विद्यार्थ्याचे सांगणे आहे.