मानखुर्दमध्ये बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू

मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर भागातील काही रहिवाशांनी सोमवारी सायंकाळी रस्त्यावर तयार केलेले अन्न खाल्ल्याने 10 ते 12 जणांना अन्नातून विषबाधा झाली. धक्कादायक म्हणजे त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे मानखुर्द परिसरात खळबळ उडाली आहे. मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर परिसरात गेल्या काही वर्षांपासून फेरीवाल्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अनेक फेरीवाले रस्त्यालगत अन्न शिजवून विकतात. महाराष्ट्र नगर येथील एका फेरीवाल्याने तयार केलेला बर्गर सोमवारी सायंकाळी 10 ते 12 जणांनी खाल्ला होता. अर्ध्या तासानंतर त्या सर्वांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे नातेवाइकांनी तातडीने काहींना जवळच्या खासगी रुग्णालयात तर काहींना पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. यातील अनेकांना उपचारानंतर रात्री उशिरा घरी पाठवण्यात आले. मात्र यातील प्रथमेश भोकसे या तरुणाचा मृत्यू झाला. प्रथमेशला प्रथम त्याच परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.हेही वाचा मुंबई : दाऊदला अखेर 40 वर्षांनंतर अटकसावधान! उबेरने प्रवास करताय? ‘अशी’ होऊ शकते फसवणूक

मानखुर्दमध्ये बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू

मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर भागातील काही रहिवाशांनी सोमवारी सायंकाळी रस्त्यावर तयार केलेले अन्न खाल्ल्याने 10 ते 12 जणांना अन्नातून विषबाधा झाली. धक्कादायक म्हणजे त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे मानखुर्द परिसरात खळबळ उडाली आहे.मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर परिसरात गेल्या काही वर्षांपासून फेरीवाल्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अनेक फेरीवाले रस्त्यालगत अन्न शिजवून विकतात. महाराष्ट्र नगर येथील एका फेरीवाल्याने तयार केलेला बर्गर सोमवारी सायंकाळी 10 ते 12 जणांनी खाल्ला होता. अर्ध्या तासानंतर त्या सर्वांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे नातेवाइकांनी तातडीने काहींना जवळच्या खासगी रुग्णालयात तर काहींना पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले.यातील अनेकांना उपचारानंतर रात्री उशिरा घरी पाठवण्यात आले. मात्र यातील प्रथमेश भोकसे या तरुणाचा मृत्यू झाला. प्रथमेशला प्रथम त्याच परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.हेही वाचामुंबई : दाऊदला अखेर 40 वर्षांनंतर अटक
सावधान! उबेरने प्रवास करताय? ‘अशी’ होऊ शकते फसवणूक

Go to Source