जुन्नर मध्ये दुचाकीची धडक होऊन अपघातात तरुणाचा मृत्यू

जुन्नर तालूक्यातील ओझर- लेण्याद्री मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे

जुन्नर मध्ये दुचाकीची धडक होऊन अपघातात तरुणाचा मृत्यू

जुन्नर तालूक्यातील ओझर- लेण्याद्री मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

ALSO READ: पुण्यातील कात्रज डेअरी आता ओळखली जाणार ‘अजितदादा पवार’ यांच्या नावाने!

मिळालेल्या माहितीनुसार, ओझर आणि लेण्याद्री या दोन अष्टविनायक तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या रस्त्यावर दोन्ही दुचाकी वेगात होत्या.  एका वळणावर दोन्ही चालकांचे नियंत्रण सुटले आणि त्यांच्यात जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आवाजामुळे परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले.

ALSO READ: 15 फेब्रुवारीनंतर नवीन खरेदीवर बंदी, राज्य सरकारच्या निर्णय
अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.या घटनेची माहिती मिळतातच स्थानिक पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला असून दोन्ही दुचाकी ताब्यात घेतल्या आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाने वेगमर्यादेबाबत ठोस पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Edited By – Priya Dixit

ALSO READ: पुण्यात दुर्दैवी अपघात: ५ वर्षांच्या मुलाला कारने ओढले; हृदयद्रावक व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद

Go to Source