तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

नको असलेले कॉल आणि असभ्य कमेंटमुळे दुखावलेल्या तरुणीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे. तरुण इंस्टाग्रामवर तरुणीबद्दल अश्लील कमेंटही करत होता. त्यामुळे अनेक दिवसांपासून तरुणी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. या सर्व गोष्टी त्यांनी घरच्यांना …

तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

नको असलेले कॉल आणि असभ्य कमेंटमुळे दुखावलेल्या तरुणीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे. तरुण इंस्टाग्रामवर तरुणीबद्दल अश्लील कमेंटही करत होता. त्यामुळे अनेक दिवसांपासून तरुणी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. या सर्व गोष्टी त्यांनी घरच्यांना सांगितल्या होत्या.  

 

मिळालेल्या माहितीनुसार 22 वर्षीय तरुणी मूळची उत्तर प्रदेशातील कैराना येथील असून ती नोएडा येथील सेक्टर 144 मध्ये राहात होती. तसेच मृत तरूणी एका खासगी कंपनीत कामाला होती. तसेच आरोपी तरुण आणि तरुणी एकमेकांना आधीच ओळखत होते. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणात राहणारा हा तरुण तिला रोज फोन करून त्रास देत असे. तसेच हा तरुण इंस्टाग्रामवर तरुणीबद्दल असभ्य कमेंटही करत होता. त्यामुळे अनेक दिवसांपासून ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. या सर्व गोष्टी त्यांनी घरच्यांना सांगितल्या होत्या. आरोपीच्या कृत्याने नाराज झालेल्या तरुणीने 29 ऑक्टोबर रोजी गळफास लावून आत्महत्या केली.

 

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. व पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source