स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटतर्फे योग सेतूवर योगदिन साजरा

सहभागींना खास डिझाइन केलेले अपसायकल इको-फ्रेंडली योगा मॅट्स प्रदान, निरोगी राहणीमानासाठी प्राधान्य पणजी : पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडने पणजी येथील योग सेतू येथे आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रम साजरा केला.या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडचे कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला, ज्याने आरोग्य आणि निरोगीपणासाठी समुदायाची बांधिलकी ठळक केली.योग सत्राचे नेतृत्व योग प्रशिक्षक तृप्ती नागवेकर आणि सोनाली कुबल यांनी केले.त्यांनी विविध योगासने आणि श्वासोच्छवासाच्या व्यायामांद्वारे सहभागींना मार्गदर्शन केले. प्रशिक्षकांचे कौशल्य आणि आकर्षक शिकवण्याच्या शैलीने प्रत्येकासाठी एक […]

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटतर्फे योग सेतूवर योगदिन साजरा

सहभागींना खास डिझाइन केलेले अपसायकल इको-फ्रेंडली योगा मॅट्स प्रदान, निरोगी राहणीमानासाठी प्राधान्य
पणजी : पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडने पणजी येथील योग सेतू येथे आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रम साजरा केला.या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडचे कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला, ज्याने आरोग्य आणि निरोगीपणासाठी समुदायाची बांधिलकी ठळक केली.योग सत्राचे नेतृत्व योग प्रशिक्षक तृप्ती नागवेकर आणि सोनाली कुबल यांनी केले.त्यांनी विविध योगासने आणि श्वासोच्छवासाच्या व्यायामांद्वारे सहभागींना मार्गदर्शन केले. प्रशिक्षकांचे कौशल्य आणि आकर्षक शिकवण्याच्या शैलीने प्रत्येकासाठी एक परिपूर्ण मार्गदर्शन केले.
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की,आजचा आंतरराष्ट्रीय योग दिन योग सेतू येथे साजरा करणे ही आपल्या समुदायाला आरोग्य आणि निरोगीपणाच्या भावनेने एकत्र आणण्याची एक उत्तम संधी होती. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत योग सेतू आपला पहिला उत्सव साजरा करत आहे. सकाळी 7 वा. सुरू झालेल्या योग कार्यक्रमातील सहभागींना खास डिझाइन केलेले अपसायकल इको-फ्रेंडली योगा मॅट्स प्रदान केले. पणजीच्या रहिवाशांचे जीवनमान उंचावणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन देत आहे. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत पायाभूत सुविधांचा वापर करून शहरातील निरोगी राहणीमान आणि समुदाय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी हे योग सत्र एक आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
पणजी महालक्ष्मी मंदिरातही उत्स्फूर्त प्रतिसाद
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त शुक्रवारी राज्यात विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राजधानी पणजीत तर पावसाची तमा न बाळगता विविध संस्थांतर्फे योगदिन साजरा करण्यात आला. पणजी शहरातील महालक्ष्मी मंदिरातही योगदिनानिमित्त नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवून योगाची प्रात्यक्षिके केली. शहरातील योग सेतू, मिरामार किनारा, दोनापावला आदी ठिकाणी विविध संस्थांतर्फे योगदिन साजरा झाला.