‘योद्धा’ 15 मार्चला प्रदर्शित होणार

चित्रपटाचा ट्रेलर सादर सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी चित्रपट ‘योद्धा’चा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. या सिद्धार्थ ‘भारतीय सैनिक’ अरुणच्या भूमिकेत दाखविण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये सैन्यातून निलंबित झाल्यावरही देशाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या सैनिकाची भूमिका दाखविण्यात आली आहे. एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये प्रवाशांचा जीव वाचविण्यासाठी दहशतवाद्यांशी लढताना नायक दाखविण्यात आला आहे. दिशा पाटनी देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. […]

‘योद्धा’ 15 मार्चला प्रदर्शित होणार

चित्रपटाचा ट्रेलर सादर
सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी चित्रपट ‘योद्धा’चा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. या सिद्धार्थ ‘भारतीय सैनिक’ अरुणच्या भूमिकेत दाखविण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये सैन्यातून निलंबित झाल्यावरही देशाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या सैनिकाची भूमिका दाखविण्यात आली आहे.
एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये प्रवाशांचा जीव वाचविण्यासाठी दहशतवाद्यांशी लढताना नायक दाखविण्यात आला आहे. दिशा पाटनी देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. ती एका केबिन क्रूची भूमिका साकारत आहे. ‘अब इस शरीर पर या तो योद्धा का यूनिफॉर्म होगा या तिरंगा’ असा संवाद सिद्धार्थच्या तोंडी आडहे.
या चित्रपटातील ‘जिंदगी तेरे नाम’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. सागर आम्ब्रे आणि पुष्कर ओझा यांच्या दिग्दर्शनात तयार हा चित्रपट 15 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.  योद्धाचा हिस्सा होणे एक असाधारण प्रवास राहिला आहे. चित्रपटाच्या कहाणीत साहस आणि देशभक्तीची प्रेरणा मिळते. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास उत्सुक असल्याचे सिद्धार्थने म्हटले आहे. चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, राशी खन्ना आणि दिशा पाटनी देखील मुख्य भूमिकेत आहे.