Mumbai Rain : मुंबईसाठी यलो अलर्ट जाहीर
गेल्या 17 दिवसांपासून वरुणराजा मुंबई व परिसराला हुलकावणी देत आहे. रविवार ९ जून नंतर पावसाने मुंबईकडे पाठ फिरवल्याने मुंबईकरांना धो-धो पावसाचे वेध लागले आहेत.आज गुरुवारी मुंबईत जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता असल्याने मुंबईत ‘यलो अलर्ट’ जारी केले आहे, तर रायगड रत्नागिरीत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आले आहे. तसेच कुडाळ, सिंधुदुर्ग संपूर्ण कोकणपट्ट्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज कुलाबा हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी व्यक्त केला.यंदा पाऊस दोन दिवस आधीच म्हणजे ९ जून रोजी दाखल झाला. पहिल्याच दिवशी पाऊस जोरदार बरसत एन्ट्री केली. त्यानंतर जून संपत आला तरी पावसाने जोर धरलेला नाही. अधूनमधून पावसाची हुलकावणी सुरू आहे. हवामान विभागाने हा आठवडा जोरदार पावसाचा असेल, असा इशारा दिला होता; मात्र जून संपत आला तरी जोर धार नाहीच, तर पुन्हा घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण आहेत. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसतात. पण नंतर पावसाने ब्रेक घेतल्याने उकाडा सुरू होतो. हवामान विभागाने दिलेला अंदाज फोल ठरत आहेत.हेही वाचामुंबईतील बाणगंगा तलावाचे नुकसान करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध FIR
Home महत्वाची बातमी Mumbai Rain : मुंबईसाठी यलो अलर्ट जाहीर
Mumbai Rain : मुंबईसाठी यलो अलर्ट जाहीर
गेल्या 17 दिवसांपासून वरुणराजा मुंबई व परिसराला हुलकावणी देत आहे. रविवार ९ जून नंतर पावसाने मुंबईकडे पाठ फिरवल्याने मुंबईकरांना धो-धो पावसाचे वेध लागले आहेत.
आज गुरुवारी मुंबईत जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता असल्याने मुंबईत ‘यलो अलर्ट’ जारी केले आहे, तर रायगड रत्नागिरीत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आले आहे.
तसेच कुडाळ, सिंधुदुर्ग संपूर्ण कोकणपट्ट्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज कुलाबा हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी व्यक्त केला.
यंदा पाऊस दोन दिवस आधीच म्हणजे ९ जून रोजी दाखल झाला. पहिल्याच दिवशी पाऊस जोरदार बरसत एन्ट्री केली. त्यानंतर जून संपत आला तरी पावसाने जोर धरलेला नाही.
अधूनमधून पावसाची हुलकावणी सुरू आहे. हवामान विभागाने हा आठवडा जोरदार पावसाचा असेल, असा इशारा दिला होता; मात्र जून संपत आला तरी जोर धार नाहीच, तर पुन्हा घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण आहेत.
अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसतात. पण नंतर पावसाने ब्रेक घेतल्याने उकाडा सुरू होतो. हवामान विभागाने दिलेला अंदाज फोल ठरत आहेत.हेही वाचा
मुंबईतील बाणगंगा तलावाचे नुकसान करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध FIR