विठुरायाच्या पंढरपुर नगरीत प्रेमाचं वेड लागणार! पाहा कोण कोण झळकणार ‘येड लागलं प्रेमाचं’ या नव्या मालिकेत
‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका देखील प्रेमातल्या वेडपणाची साक्ष देणारी असणार आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत अशी ओळख असणाऱ्या विठुरायाच्या पंढरपुर नगरीत या मालिकेची गोष्ट घडणार आहे.
