Yavatmal : चारित्र्यावरील संशयातून रागाच्या भरात जावयाने केला पत्नी ,सासरा, 2 मेहुण्यांचा खून

Yavatmal :पती पत्नीच्या नात्यात विश्वास असणे महत्त्वाचे आहे. नात्यात अविश्वास असला की नात्याला तडा जातो. त्यात जर पती किंवा पत्नी संशयी स्वभावाचे असतील तर नातं टिकणं अशक्य आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने यवतमाळ जिल्ह्यात कळंब तालुक्यात …

Yavatmal : चारित्र्यावरील संशयातून रागाच्या भरात जावयाने केला पत्नी ,सासरा, 2 मेहुण्यांचा खून

Yavatmal :पती पत्नीच्या नात्यात विश्वास असणे महत्त्वाचे आहे. नात्यात अविश्वास असला की नात्याला तडा जातो. त्यात जर पती किंवा पत्नी संशयी स्वभावाचे असतील तर नातं टिकणं अशक्य आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने यवतमाळ जिल्ह्यात कळंब तालुक्यात तिरझडा पारधी बेड्यावर एका व्यक्तीने आपल्या पत्नी, सासरा आणि दोन मेहुण्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोविंद विरचंद पवार असे या आरोपी जावयाचं नाव आहे. तर या हत्याकांडात पत्नी रेखा गोविंद पवार, सासरा पंडित घोसाळे ,मेहुणा सुनील भोसले, व ज्ञानेश्वर भोसले मयत झाले आहे. 

सदर घटना कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्याची आहे आरोपी गोविंद आपल्या पत्नीसह राहत होता. त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. या कारणामुळे दोघात नेहमी वाद व्हायचे. गोविंद हा पत्नीला मारहाण करत होता. नेहमीच्या वादाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली. 

पत्नी रेखा ने घरी परत यावे या वरून त्याने सासरी जाऊन वाद घातले. मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास, गोविंद हा धारधार शस्त्र घेऊन पत्नीच्या माहेरी गेला आणि तिथे त्याचे सासरच्या मंडळींशी वाद झाले. रागाच्या भरात येऊन त्याने सोबत आणलेल्या धारधार शस्त्राने पत्नी, सासरे आणि दोन मेहुण्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी रेखा, सासरा, आणि मेहुणे यांचा जागीच मृत्यू झाला आणि सासू रुखमा भोसले या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घडलेल्या घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. आरोपी जावई गोविंद पवार ला पोलिसांनी खुनाच्या आरोपलाखाली अटक केली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.  

 

Edited By- Priya DIxit  

 

Go to Source