Yatri अॅपचे प्रवाशांसाठी रिअल-टाइम चॅट फीचर सुरू
भारतीय रेल्वेच्या अधिकृत मुंबई लोकल अॅप ‘यात्री’ने सोमवारी अॅपने ‘यात्री चॅट’ नावाच्या रिअल-टाईम इन-अॅप चॅट फिचरची घोषणा केली. हे फिचर मुंबईच्या 80 लाख लोकल प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान सतत कनेक्टेड आणि अपडेटेड ठेवण्यासाठी आणण्यात आले आहे. या नवीन चॅट फिचरमध्ये मुंबईतील प्रमुख रेल्वे मार्गांसाठी वेस्टर्न लाइन, सेंट्रल लाइन, हार्बर लाइन आणि ट्रान्स-हार्बर लाइन आणि स्वतंत्र कम्युनिटी ग्रुप्स असतील.
यात्री चॅटमुळे प्रवासी एकमेकांशी अपडेट्स शेअर करू शकतात. तसेच त्यांच्या दैनंदिन प्रवासादरम्यान माहिती मिळवू शकतात. नवीन ‘रिप्लाय’ फिचरमुळे वापरकर्ते आता रिअल-टाईम, दोन-मार्गी संभाषण करू शकतात. प्रश्न विचारणे, उत्तर देणे आणि प्रत्यक्ष परिस्थितीवरील अपडेट्स शेअर करणे शक्य झाले आहे. चॅट्स हे मार्गनिहाय विभागलेले असल्यामुळे संभाषण संबंधित आणि प्रवाशांसाठी उपयुक्त ठरेल.
यात्रीच्या सह-संस्थापक रीव्हा साकरिया म्हणाल्या, “मुंबईची लोकल ही केवळ वाहतुकीचे साधन नाही. इथे कथा शेअर केल्या जातात, मैत्री निर्माण होते, आणि रोजचा प्रवास एक सामायिक अनुभव बनतो. ‘यात्री चॅट’मुळे आता तोच कम्युनिटी स्पिरिट डिजिटल जगात आला आहे. 80 लाख प्रवाशांना आम्ही एकत्र जोडत आहोत.”
व्हॉट्सअॅप ग्रुपपेक्षा हे कसे वेगळे असेल, असे विचारले असता त्या म्हणाल्या. “व्हॉट्सअॅपमध्ये सदस्यसंख्येवर मर्यादा असते. पण ‘यात्री चॅट’मध्ये लाईन-विशिष्ट ग्रुप्स असल्याने वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर, ट्रान्स-हार्बर संभाषण तेवढ्या मार्गापुरते मर्यादित राहते आणि उपयुक्त ठरते. 2021 मध्ये आम्ही यात्री अॅप लाँच केले आणि प्रवाशांनी ते लगेच स्विकारले. आता या नवीन फिचरवरही आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि गरज भासल्यास सुधारणा करू.”
मुंबईत ‘ट्रेन फ्रेंड्स’ किंवा ‘माझा ट्रेन ग्रुप’ ही संस्कृती फक्त स्थानिकांना खऱ्या अर्थाने समजते. आता अॅपमधील हे फिचर त्या अनुभवाला डिजिटल स्वरूप देत आहे. हे फिचर लोकल ट्रेनविषयक ताज्या, मार्गनिहाय माहितीसाठी एक विश्वासार्ह स्रोत ठरू शकते. आणि त्याचबरोबर कदाचित आणखी काही ‘ट्रेन फ्रेंड्स’ही मिळू शकतात.हेही वाचामुंबई: मेट्रो 11 च्या प्रस्तावाला मंजुरी
Home महत्वाची बातमी Yatri अॅपचे प्रवाशांसाठी रिअल-टाइम चॅट फीचर सुरू
Yatri अॅपचे प्रवाशांसाठी रिअल-टाइम चॅट फीचर सुरू
भारतीय रेल्वेच्या अधिकृत मुंबई लोकल अॅप ‘यात्री’ने सोमवारी अॅपने ‘यात्री चॅट’ नावाच्या रिअल-टाईम इन-अॅप चॅट फिचरची घोषणा केली. हे फिचर मुंबईच्या 80 लाख लोकल प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान सतत कनेक्टेड आणि अपडेटेड ठेवण्यासाठी आणण्यात आले आहे.
या नवीन चॅट फिचरमध्ये मुंबईतील प्रमुख रेल्वे मार्गांसाठी वेस्टर्न लाइन, सेंट्रल लाइन, हार्बर लाइन आणि ट्रान्स-हार्बर लाइन आणि स्वतंत्र कम्युनिटी ग्रुप्स असतील.
यात्री चॅटमुळे प्रवासी एकमेकांशी अपडेट्स शेअर करू शकतात. तसेच त्यांच्या दैनंदिन प्रवासादरम्यान माहिती मिळवू शकतात.
नवीन ‘रिप्लाय’ फिचरमुळे वापरकर्ते आता रिअल-टाईम, दोन-मार्गी संभाषण करू शकतात. प्रश्न विचारणे, उत्तर देणे आणि प्रत्यक्ष परिस्थितीवरील अपडेट्स शेअर करणे शक्य झाले आहे. चॅट्स हे मार्गनिहाय विभागलेले असल्यामुळे संभाषण संबंधित आणि प्रवाशांसाठी उपयुक्त ठरेल.
यात्रीच्या सह-संस्थापक रीव्हा साकरिया म्हणाल्या, “मुंबईची लोकल ही केवळ वाहतुकीचे साधन नाही. इथे कथा शेअर केल्या जातात, मैत्री निर्माण होते, आणि रोजचा प्रवास एक सामायिक अनुभव बनतो. ‘यात्री चॅट’मुळे आता तोच कम्युनिटी स्पिरिट डिजिटल जगात आला आहे. 80 लाख प्रवाशांना आम्ही एकत्र जोडत आहोत.”
व्हॉट्सअॅप ग्रुपपेक्षा हे कसे वेगळे असेल, असे विचारले असता त्या म्हणाल्या. “व्हॉट्सअॅपमध्ये सदस्यसंख्येवर मर्यादा असते. पण ‘यात्री चॅट’मध्ये लाईन-विशिष्ट ग्रुप्स असल्याने वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर, ट्रान्स-हार्बर संभाषण तेवढ्या मार्गापुरते मर्यादित राहते आणि उपयुक्त ठरते. 2021 मध्ये आम्ही यात्री अॅप लाँच केले आणि प्रवाशांनी ते लगेच स्विकारले. आता या नवीन फिचरवरही आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि गरज भासल्यास सुधारणा करू.”
मुंबईत ‘ट्रेन फ्रेंड्स’ किंवा ‘माझा ट्रेन ग्रुप’ ही संस्कृती फक्त स्थानिकांना खऱ्या अर्थाने समजते. आता अॅपमधील हे फिचर त्या अनुभवाला डिजिटल स्वरूप देत आहे. हे फिचर लोकल ट्रेनविषयक ताज्या, मार्गनिहाय माहितीसाठी एक विश्वासार्ह स्रोत ठरू शकते. आणि त्याचबरोबर कदाचित आणखी काही ‘ट्रेन फ्रेंड्स’ही मिळू शकतात.हेही वाचा
मुंबई: मेट्रो 11 च्या प्रस्तावाला मंजुरी