धामणे येथील श्री काळम्मादेवीची यात्रा उत्साहात
वार्ताहर /धामणे
धामणे येथील आराध्य दैवत श्री काळम्मादेवीची यात्रा मंगळवार दि. 16 रोजी परंपरेनुसार भक्तीमय आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. मंगळवारी सकाळी 6 वा. देवीचे हक्कदार पाटील बंधूंच्यावतीने देवीला अभिषेक घालण्यात येवून विधीवत पूजन करण्यात आले. काळम्मादेवीचे मंदिर धामणे गावापासून दोन किलोमीटर धामणे ते के के कोप रस्त्याशेजारी शेतवडीत आहे. त्यामुळे ही यात्रा गावाबाहेरच होते. यात्रेला सुरुवात दुपारनंतर झाली. रात्री 8 ते 8.30 पर्यंत सांगता झाली. तत्पूर्वी दुपारी 12.30 वा. धामणे बसवाण गल्लीतून सवाद्य मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक दुपारी 1.30 वा. श्री काळम्मा देवीच्या मंदिरात पोहचली. त्यानंतर मंदिरात देवीचे विधीवत पूजन झाल्यानंतर देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होवून सायंकाळी 7.30 वा. पर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. रात्री 8 वा. देवीला नैवेद्य दाखवून पुन्हा देवीची विधीवत पुजा करण्यात आली व देवीला गाऱ्हाणे घालण्यात आले. आणि आरती झाल्यानंतर या यात्रेची सांगता झाली. यात्रेला धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी, बेळगाव शहर व तालुक्यातील हजारो भाविकांनी उपस्थित राहून श्री काळम्मा देवीचे दर्शन घेतले.
Home महत्वाची बातमी धामणे येथील श्री काळम्मादेवीची यात्रा उत्साहात
धामणे येथील श्री काळम्मादेवीची यात्रा उत्साहात
वार्ताहर /धामणे धामणे येथील आराध्य दैवत श्री काळम्मादेवीची यात्रा मंगळवार दि. 16 रोजी परंपरेनुसार भक्तीमय आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. मंगळवारी सकाळी 6 वा. देवीचे हक्कदार पाटील बंधूंच्यावतीने देवीला अभिषेक घालण्यात येवून विधीवत पूजन करण्यात आले. काळम्मादेवीचे मंदिर धामणे गावापासून दोन किलोमीटर धामणे ते के के कोप रस्त्याशेजारी शेतवडीत आहे. त्यामुळे ही यात्रा गावाबाहेरच […]
