यात्रा-जत्रांचा बससेवेवर अतिरिक्त ताण

प्रवाशांची गैरसोय, बसफेऱ्या विस्कळीत प्रतिनिधी/ बेळगाव यात्रा-जत्रा आणि लग्नसराईमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बससेवेवर प्रवाशांचा अतिरिक्त ताण वाढला आहे. परिणामी विविध मार्गांवर प्रवाशांचे बसफेऱ्याविना हाल होऊ लागले आहेत. ग्रामीण भागातील सांबरा, मण्णिकेरी, हुदली गावच्या महालक्ष्मी यात्रांना उत्साहात प्रारंभ झाला आहे. त्यामुळे भाविकांची संख्या या मार्गांवर वाढली आहे. मात्र खासगी वाहने आणि इतर […]

यात्रा-जत्रांचा बससेवेवर अतिरिक्त ताण

प्रवाशांची गैरसोय, बसफेऱ्या विस्कळीत
प्रतिनिधी/ बेळगाव
यात्रा-जत्रा आणि लग्नसराईमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बससेवेवर प्रवाशांचा अतिरिक्त ताण वाढला आहे. परिणामी विविध मार्गांवर प्रवाशांचे बसफेऱ्याविना हाल होऊ लागले आहेत.
ग्रामीण भागातील सांबरा, मण्णिकेरी, हुदली गावच्या महालक्ष्मी यात्रांना उत्साहात प्रारंभ झाला आहे. त्यामुळे भाविकांची संख्या या मार्गांवर वाढली आहे. मात्र खासगी वाहने आणि इतर वाहनांमुळे यात्रा असलेल्या गावांमध्ये वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. परिणामी परिवहनच्या बसेस या कोंडीमध्ये अडकत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. आधीच प्रवाशांची संख्या वाढत असल्याने बसफेऱ्या अनियमित होऊ लागल्या आहेत. त्यातच यात्रेतील गर्दी बससाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.
शक्ती योजनेमुळे महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. लग्नसराई आणि यात्रेसाठी जाणाऱ्या महिला परिवहन बसलाच प्राधान्य देऊ लागल्या आहेत. त्यामुळे काही मार्गावर चेंगराचेंगरी करत प्रवास करावा लागत आहे. उन्हाळी हंगामात प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यातच यात्रा-जत्रांमुळे प्रवाशी संख्येत भर पडली आहे. त्यामुळे बससेवेचेही तीनतेरा वाजू लागले आहेत.