यल्लम्मा यात्रा परिवहनला पावली

26 लाखांचा महसूल : अतिरिक्त बससेवेतून समाधानकारक उत्पन्न बेळगाव : शाकंभरी पौर्णिमेनिमित्त बेळगाव-सौंदत्ती मार्गावर सोडलेल्या विशेष यात्रा बससेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या यात्रा काळातून परिवहनला तब्बल 26 लाख 83 हजारांचा महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या परिवहनला यल्लम्मा देवी पावली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती यल्लम्मा यात्रेसाठी जाणाऱ्या भक्तांची […]

यल्लम्मा यात्रा परिवहनला पावली

26 लाखांचा महसूल : अतिरिक्त बससेवेतून समाधानकारक उत्पन्न
बेळगाव : शाकंभरी पौर्णिमेनिमित्त बेळगाव-सौंदत्ती मार्गावर सोडलेल्या विशेष यात्रा बससेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या यात्रा काळातून परिवहनला तब्बल 26 लाख 83 हजारांचा महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या परिवहनला यल्लम्मा देवी पावली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती यल्लम्मा यात्रेसाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी असते. यासाठी 21 ते 31 जानेवारी दरम्यान परिवहनने सौंदत्तीसाठी जादा बस सोडल्या होत्या. भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने जादा 60 बसची व्यवस्था केली होती. दैनंदिन 70 ते 80 बसेस बेळगाव-सौंदत्ती मार्गावर धावत होत्या. शिवाय शक्ती योजनेंतर्गत महिलांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे बससेवेला प्रतिसाद चांगला मिळाला. परिणामी उत्पन्न समाधानकारक मिळाले आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून ही यात्रा अतिरिक्त बस सोडण्यात आली होती. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत बसफेऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सद्य परिस्थितीतही बेळगाव-सौंदत्ती मार्गावर यात्रा विशेष बस सोडण्यात येत आहेत. त्यामुळे उत्पन्नात आणखी भर पडणार आहे. यंदा यल्लम्मा यात्रेला जाणाऱ्या भक्तांची संख्या वाढली होती. त्यामुळे बसप्रवासी संख्येत साहजीकच वाढ झाली होती. त्यामुळे या यात्रेतून अतिरिक्त उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे आर्थिकदृट्या अडचणीत सापडलेल्या परिवहनला काहीसा दिलासा मिळाला आहे.
सद्य परिस्थितीतही जादा विशेष बसेस- के. के. लमाणी-डीटीओ
सौंदत्ती-बेळगाव मार्गावर शाकंभरी पौर्णिमेसाठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. सद्य परिस्थितीतही जादा विशेष बसेस धावत आहेत. 21 ते 1 फेब्रुवारी दरम्यान धावलेल्या अतिरिक्त बससेवेतून 26 लाख 83 हजारांचा महसूल प्राप्त झाला आहे. काही बसेस बुकही करण्यात आल्या होत्या. त्यामुळे यात्रेतून समाधानकारक उत्पन्न मिळाले आहे.