यल्लम्मा डोंगर भाविकांनी गजबजला

भंडाऱ्याच्या उधळणीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत कंकण मंगळसुत्राचा विधी बाळेकुंद्री : ‘उदो ग आई उदो’चा गजर व भंडाऱ्याच्या उधळणीत कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीची यात्रा पार पडली. अडीच लाखाहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतल्याची माहिती देवस्थानचे कार्यनिर्वाहक अधिकारी एसबीपी महेश यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. मार्गशीर्ष पौर्णिमेला भरणाऱ्या […]

यल्लम्मा डोंगर भाविकांनी गजबजला

भंडाऱ्याच्या उधळणीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत कंकण मंगळसुत्राचा विधी
बाळेकुंद्री : ‘उदो ग आई उदो’चा गजर व भंडाऱ्याच्या उधळणीत कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीची यात्रा पार पडली. अडीच लाखाहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतल्याची माहिती देवस्थानचे कार्यनिर्वाहक अधिकारी एसबीपी महेश यांनी ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’शी बोलताना दिली. मार्गशीर्ष पौर्णिमेला भरणाऱ्या या यात्रेस भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती. यात्रेच्या मुख्य दिवशी सोमवारी महाराष्ट्रासह परराज्यातील विविध ठिकठिकाणांहून आलेल्या भाविकांनी  डोंगर फुलून गेला होता. मंदिरापासून 3 कि.मी.वरील खुल्या जागेत पार्किंगची व्यवस्था केली होती. दरम्यान देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महिला व पुरुषांना स्वतंत्र रांगा केल्याने दर्शन घेणे सुलभ झाले. जोगुळभावी पुंडात भाविकांनी स्नानासाठी एकच गर्दी केली होती. देवीच्या दर्शनानंतर मंदिरापासून 3 कि.मी. अंतरावरील पारसगड येथील रामलिंग देवस्थानात दर्शनासाठी गर्दी केली होती.  श्री मौनेश्वर व परशुराम मंदिरातही गर्दी झाली होती.
पालखी मिरवणूक
सोमवारी सायंकाळी उत्सव मूर्तीसह पालखी मिरवणूक  काढण्यात आली. सदर मिरवणूक मौनेश्वर मंदिरातपर्यंत नेण्यात आली. त्या ठिकाणी ‘उदो ग आई उदो’च्या जयघोषात कंकण मंगळसूत्र विसर्जनचा विधी पार पाडला. या मिरवणुकीत भाविक ढोल ताशांच्या तालात व अबिर भंडाऱ्याची उधळण करत होते. तत्पूर्वी भाविकांनी दुपारपर्यंत पडल्या भरण्याचा कार्यक्रम आटोपून घेतला.सोमवारी पहाटेपासून अडीच लाखांहून अधिक भाविकांचा अथांग जनसागर डोंगरावर लोटला होता. सायंकाळी हुली गावचे स्वामी व मंदिराचे अर्चक यांच्या उपस्थितीत देवीची पूजा झाली. यावेळी देवस्थानचे सभासद उपस्थित होते. सायंकाळी उशिरा यात्रेsकरूंनी परतीचा मार्ग धरला. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, गडहिंग्लज, आजरा, पुणे, चंदगड व कर्नाटकातील विजापूर, बागलकोट, धारवाड, हुबळी भागातील भाविकांनी डोंगर फुलून गेला होता. मंगळवारी मंदिरात होमहवन विधी पार पडणार आहे. दरम्यान, यात्राकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.