अनगोळ येथे यल्लम्मा देवीची यात्रा उत्साहात

बेळगाव : अनगोळ येथे रेणूका देवीची यात्रा व मारग मळण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात मंगळवारी पार पडला. ‘उदो ग आई उदो’च्या गजरात भंडाऱ्याची उधळण करत ही यात्रा पार पडली. सोमवारी सायंकाळी सौंदत्ती येथील यल्लम्मा डोंगर येथून देवीचा जग अनगोळ येथे आणण्यात आला. त्यानंतर ही यात्रा मंगळवारी पार पडली. भाविकांना अंधाराचा त्रास होऊ नये यासाठी सर्वत्र विद्युत […]

अनगोळ येथे यल्लम्मा देवीची यात्रा उत्साहात

बेळगाव : अनगोळ येथे रेणूका देवीची यात्रा व मारग मळण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात मंगळवारी पार पडला. ‘उदो ग आई उदो’च्या गजरात भंडाऱ्याची उधळण करत ही यात्रा पार पडली. सोमवारी सायंकाळी सौंदत्ती येथील यल्लम्मा डोंगर येथून देवीचा जग अनगोळ येथे आणण्यात आला. त्यानंतर ही यात्रा मंगळवारी पार पडली. भाविकांना अंधाराचा त्रास होऊ नये यासाठी सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आली होती. देवीच्या गदगेलाही आकर्षक सजावट करण्यात आली होती. देवस्की महिला देवीची पडली घेऊन एकत्र आल्या होत्या. पडल्या भरून त्यानंतर दर्शन घेण्यात आले. यावेळी महाप्रसादाचा लाभ भक्तांनी घेतला. कार्यक्रमावेळी गावातील भाविक व देवस्की महिला, अरुण बेरडे-पुजारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.