झेवियर्स, हेरवाडकर, केएलएस विजयी

युनायटेड गोवन्स चषक फुटबॉल स्पर्धा :  ज्योती सेंट्रल, केएलई, भरतेश, केव्ही-2 पुढील फेरीत बेळगाव : युनायटेड गोवन्स रिक्वेशन क्लब आयोजित तिसऱ्या युनायटेड गोवन्स आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन दिवशी सेंट झेवियर्सने एमव्हीएमचा, हेरवाडकरने मदनीचा, ज्योती सेंटरने मुक्तांगणचा, केएलई इंटरनॅशनलने शेख सेंटरचा, केव्ही 2 ने सेंटपॉलचा, भरतेशने संत मीराचा तर केएलएसने ज्ञान मंदिरचा पराभव करून विजयी सलामी दिली. टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावरती […]

झेवियर्स, हेरवाडकर, केएलएस विजयी

युनायटेड गोवन्स चषक फुटबॉल स्पर्धा :  ज्योती सेंट्रल, केएलई, भरतेश, केव्ही-2 पुढील फेरीत
बेळगाव : युनायटेड गोवन्स रिक्वेशन क्लब आयोजित तिसऱ्या युनायटेड गोवन्स आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन दिवशी सेंट झेवियर्सने एमव्हीएमचा, हेरवाडकरने मदनीचा, ज्योती सेंटरने मुक्तांगणचा, केएलई इंटरनॅशनलने शेख सेंटरचा, केव्ही 2 ने सेंटपॉलचा, भरतेशने संत मीराचा तर केएलएसने ज्ञान मंदिरचा पराभव करून विजयी सलामी दिली. टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावरती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर आनंद चव्हाण, युनायटेड गोवन्सचे अध्यक्ष शंतनू पिसाळकर, सचिव इग्नोटीयस मस्कहंस, डॉ. जॉर्ज रॉड्रीग्स, विलियम मिंडोसा, सुनील कल्याणपूर, सॅलविस्टन मस्कहंस, बेनी कोर्डोज, विजय रेडेकर, अखिलेश अष्टेकर, सुदर्शन चौगुले, यश सुतार व कौशिक पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते चेंडू लाथाडून व खेळाडूंची ओळख करून घेऊन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
पहिल्या सामन्यात सेंट झेवियर्सने एमव्हीएमचा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात सातव्या मिनिटाला आर्सलन मुल्लाने पहिला गोल केला. 21 व्या मिनिटाला रूझेन उचगावकरने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 28 व्या मिनिटाला सुफियान बिस्तीने तिसरा गोल केला तर 41 व्या मिनिटाला इशान घाटगेने चौथा गोल करून 4-0 ची आघाडी सेंट झेवियर्सने मिळविली. दुसऱ्या सामन्यात एमव्ही हेरवाडकरने मदनी संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 17 व्या मिनिटाला हेरवाडकरच्या वेदांत पाटीलने पहिला गोल केला तर 33 व्या मिनिटाला प्रथमेश अणवेकरने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या सामन्यात ज्योती सेंट्रल संघाने मुक्तांगण संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात दुसऱ्या सत्रात 37 व्या मिनिटाला ज्योतीच्या विवेक यादवने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली.
या सामन्यात कडव्या लढतीनंतर मुक्तांगण संघाला पराभवास सामोरे जावे लागले. चौथ्या सामन्यात केएलई इंटरनॅशनल संघाने शेख सेंट्रल संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 13 व्या मिनिटाला केएलईच्या कुणाल हरीचंदनने पहिला गोल केला. तर 21 व्या मिनिटाला अब्दुल हकीमने दुसरा गोल करून 2-0 ची महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. पाचव्या सामन्यात बलाढ्या सेंटपॉल संघाचा केव्ही2 संघाने 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 18 व्या मिनिटाला सेंटपॉलच्या खेळाडूने चेंडू बाहेर काढण्यात स्वत:च्या गोलमुखात चेंडू मारून स्वयंचित गोल केव्ही2 ला करून दिला. 25 व्या मिनिटाला हर्षल गौरवने दुसरा गोल केला. तर 34 व्या मिनिटाला अथर्व तंबलकरने तिसरा गोल करून 3-0 ची आघाडी मिळवित विजय मिळविला. सहाव्या सामन्यात भरतेशने बलाढ्या संत मीराचा टायब्रेकरमध्ये 4-3 असा पराभव केला.
या सामन्यात निर्धारीत वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये भरतेशने 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला. भरतेशतर्फे सुमेध कुसन्नावर, साहिद बेल्लद, अरिहंत संताजी, समर्थ मोरे यांनी गोल केले तर गोलरक्षक निपुन चौगुलेने दोन चेंडू अडवून विजयात सिंहाचा वाटा उचलला. तर संत मीरातर्फे शुभम धाकलूचे, अब्दुल मुल्ला, नवाज यांनी गोल केले. सातव्या सामन्यात केएलएसने ज्ञान मंदिरचा 5-0 असा पराभव केला. या सामन्यात 17 व्या मिनिटाला जय रेवणकरने पहिला गोल केला तर 20 व्या मिनिटाला श्रेयस कंग्राळकरने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात प्रणव लाडने 36 व 41 व्या मिनिटाला सलग दोन गोल केले. तर 44 व्या मिनिटाल जय रेवणकरने पाचवा गोल केला.