कुस्तीपटू आणि अभिनेता जॉन सीनाची WWE मधून निवृत्तीची घोषणा

कुस्तीपटू आणि अभिनेता जॉन सीनाची WWE मधून निवृत्तीची घोषणा

John Cena

कुस्तीपटू आणि अभिनेता जॉन सीनाने WWE मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. जॉन 2001 पासून WWE शी संबंधित आहे आणि त्याने 16 वेळा वर्ल्ड चॅम्पियनचे विजेतेपद पटकावले आहे. जॉन सीनाने घोषणा केली की तो WWE मधून रेसलमेनिया 2025 नंतर निवृत्त होत 

23 वर्षांहून अधिक काळ लोक जॉन सीनाला रिंगमध्ये कुस्ती करताना पाहत आहेत आणि पुढच्या वर्षी जेव्हा तो शेवटच्या वेळी रिंगमध्ये उतरेल तेव्हा त्याच्या चाहत्यांसाठी तो एक भावनिक क्षण असणार आहे.

जॉन सीना 2018 पासून केवळ पार्ट-टाइम WWE मध्ये दिसला आहे.

जॉन सीनाने ‘मनी इन द बँक’ या WWE कुस्ती स्पर्धेदरम्यान निवृत्तीची घोषणा केली. 2010 पासून दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. यावेळी जॉन सीनाच्या उपस्थितीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तो का आला आणि काय करणार हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे होते. जॉनने लोकांना सांगितले की, आज रात्री मी WWE मधून माझ्या निवृत्तीची अधिकृत घोषणा करत आहे.जॉन सीनाने सांगितले की तो मंडे नाईट रॉमध्ये भाग घेण्याची योजना आखत आहे

जानेवारी 2025 मध्ये लोक ते नेटफ्लिक्सवर पाहू शकतील. जॉन म्हणाला की तो कधीही नेटफ्लिक्सवर रॉचा भाग झाला नाही आणि म्हणून हे पहिल्यांदाच होणार आहे.

 

Edited by – Priya Dixit  

 

 

 

Go to Source