40 फुटापेक्षा मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश
मध्य रेल्वे (central railway) आणि पश्चिम रेल्वे (western railway) यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून (DDMA) 40 फुटापेक्षा मोठे होर्डिंग्स काढण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. सोमवार 22 जुलै रोजी प्रशासकीय कार्यालयात झालेल्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले.बृहन्मुंबई महानगरपालिका (bmc) अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी आणि अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व DDMA सदस्य आणि नागरी परवाना विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि वाहतूक पोलिसांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यात महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA), मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्या प्रतिनिधींचाही समावेश होता.बैठक चर्चासंभाव्य अपघात रोखण्यासाठी मर्यादेपेक्षा जास्त आकाराचे होर्डिंग हटवण्याच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. 2008 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या महापालिकेच्या धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वांनुसार मुंबईत आउटडोअर होर्डिंग 40 फुटापेक्षा मोठे नसावे. वाऱ्याचा वेग लक्षात घेऊन हे नियम निश्चित करण्यात आले आहेत. तसेच सर्व एजन्सींनी होर्डिंगच्या 40 बाय 40 आकाराच्या मर्यादेवर सहमती दर्शविली होती. रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्रतिसादपश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी आधीच पाच जाहिरातदारांना 40 फुटापेक्षा मोठे होर्डिंग काढण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्याच्या देखील सूचना दिल्या आहेत. मात्र, त्यावर अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही. ही होर्डिंग्ज बोरिवली, चर्नी रोड आणि वांद्रे येथे आहेत. या निर्णयामुळे वांद्रे महामार्गावरील 120 फूट बाय 120 फूट आकाराचे होर्डिंग पालिकेने कारवाई करत काढले. घाटकोपर दुर्घटनेनंतर पालिकेला आली जाग 13 मे रोजी होर्डिंग (hoarding) कोसळल्यानंतर डीडीएमएने दोन्ही रेल्वे अधिकाऱ्यांना रेल्वे मालमत्तेवर लावलेले अवाजवी आणि बेकायदेशीर (illegal) होर्डिंग (banner) काढण्यासाठी नोटीस पाठवली होती. ही नोटीस 15 मे रोजी पाठवली होती. मात्र, रेल्वेने त्यांच्या धोरणांचे कारण देत सूचना नाकारल्या. महापालिकेने अखेर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दोन्ही रेल्वे अधिकाऱ्यांनी आदेशाचे पालन केले नाही अशी याचिका दाखल केली. 10 जुलै रोजी, सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांना होर्डिंगच्या आकारांबाबत 15 मे रोजी लागू केलेल्या महापालिकेच्या निर्देशांचे पालन करण्याचे आदेश दिले.सुप्रीम कोर्टाने बीएमसीच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तांना दोन आठवड्यांत बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. यावर प्रतिसाद म्हणून डीडीएमएने बैठक घेतली. या बैठकीत 40 फुटापेक्षा मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश देण्यात आले. हेही वाचामुंबई : एका आठवड्यात वेबसाइटवर कुत्र्यांबाबत 150 तक्रारीकोकणासाठी मुंबईतून 202 गणपती स्पेशल ट्रेन धावणार
Home महत्वाची बातमी 40 फुटापेक्षा मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश
40 फुटापेक्षा मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश
मध्य रेल्वे (central railway) आणि पश्चिम रेल्वे (western railway) यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून (DDMA) 40 फुटापेक्षा मोठे होर्डिंग्स काढण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. सोमवार 22 जुलै रोजी प्रशासकीय कार्यालयात झालेल्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले.
बृहन्मुंबई महानगरपालिका (bmc) अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी आणि अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व DDMA सदस्य आणि नागरी परवाना विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि वाहतूक पोलिसांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यात महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA), मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्या प्रतिनिधींचाही समावेश होता.
बैठक चर्चा
संभाव्य अपघात रोखण्यासाठी मर्यादेपेक्षा जास्त आकाराचे होर्डिंग हटवण्याच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. 2008 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या महापालिकेच्या धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वांनुसार मुंबईत आउटडोअर होर्डिंग 40 फुटापेक्षा मोठे नसावे. वाऱ्याचा वेग लक्षात घेऊन हे नियम निश्चित करण्यात आले आहेत. तसेच सर्व एजन्सींनी होर्डिंगच्या 40 बाय 40 आकाराच्या मर्यादेवर सहमती दर्शविली होती.
रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद
पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी आधीच पाच जाहिरातदारांना 40 फुटापेक्षा मोठे होर्डिंग काढण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्याच्या देखील सूचना दिल्या आहेत. मात्र, त्यावर अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही. ही होर्डिंग्ज बोरिवली, चर्नी रोड आणि वांद्रे येथे आहेत. या निर्णयामुळे वांद्रे महामार्गावरील 120 फूट बाय 120 फूट आकाराचे होर्डिंग पालिकेने कारवाई करत काढले.
घाटकोपर दुर्घटनेनंतर पालिकेला आली जाग
13 मे रोजी होर्डिंग (hoarding) कोसळल्यानंतर डीडीएमएने दोन्ही रेल्वे अधिकाऱ्यांना रेल्वे मालमत्तेवर लावलेले अवाजवी आणि बेकायदेशीर (illegal) होर्डिंग (banner) काढण्यासाठी नोटीस पाठवली होती. ही नोटीस 15 मे रोजी पाठवली होती. मात्र, रेल्वेने त्यांच्या धोरणांचे कारण देत सूचना नाकारल्या.
महापालिकेने अखेर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दोन्ही रेल्वे अधिकाऱ्यांनी आदेशाचे पालन केले नाही अशी याचिका दाखल केली. 10 जुलै रोजी, सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांना होर्डिंगच्या आकारांबाबत 15 मे रोजी लागू केलेल्या महापालिकेच्या निर्देशांचे पालन करण्याचे आदेश दिले.
सुप्रीम कोर्टाने बीएमसीच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तांना दोन आठवड्यांत बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. यावर प्रतिसाद म्हणून डीडीएमएने बैठक घेतली. या बैठकीत 40 फुटापेक्षा मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश देण्यात आले. हेही वाचा
मुंबई : एका आठवड्यात वेबसाइटवर कुत्र्यांबाबत 150 तक्रारी
कोकणासाठी मुंबईतून 202 गणपती स्पेशल ट्रेन धावणार