विश्वविक्रमी मॅरेथॉनपटू केल्विन किप्टमचा अपघाती मृत्यू
वृत्तसंस्था/ नैरोबी (केनिया)
मॅरेथॉन विश्वविक्रमधारक केल्विन किप्टम याला केनियामध्ये झालेल्या कार अपघातात प्रशिक्षकासह मृत्यू येण्याची घटना घडली आहे. केल्विन हा दीर्घ पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतींचा सुपरस्टार बनला होता आणि यावर्षी पॅरिस येथे होणार असलेल्या ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकाचा अव्वल दावेदार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते.
रविवारी उशिरा हा अपघात घडला. यावेळी किप्टम गाडी चालवत होता. सदर गाडी रस्त्याच्या बाहेर जाऊन एका खड्ड्यातत पडली आणि नंतर झाडावर आदळली, असे पोलिसांनी सांगितले. किप्टम 24 वर्षांचा होता आणि मागील काही वर्षांमध्ये धावण्याच्या शर्यतीत उदयाला आलेल्या प्रतिभांपैकी एक होता. त्याने नामांकित मॅरेथॉनमधील केवळ तिसऱ्या सहभागात जागतिक विक्रम मोडला होता. गेल्या वर्षीच्या शिकागो मॅरेथॉनमध्ये स्थापित केलेल्या त्याच्या विक्रमाला आंतरराष्ट्रीय ट्रॅक फेडरेशन ‘वर्ल्ड अॅथलेटिक्स’ने गेल्याच आठवड्यात मान्यता दिली होती.
त्याच्या मृत्यूचे जोरदार पडसाद केनियामध्ये उमटले, कारण तिथे धावपटू हे सर्वांत मोठे ‘स्पोर्ट्स स्टार’ असतात. ‘तो फक्त 24 वर्षांचा होता, किप्टम हे आमचे भविष्य होते’, असे केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम ऊटो यांनी शोक व्यक्त करताना जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. किप्टम आणि त्याचे रवांडातील प्रशिक्षक गेर्व्हाइस हकिझिमाना हे रात्री 11 च्या सुमारास झालेल्या अपघातात ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. केनिया आणि उर्वरित जगभरातील सर्वोत्तम दीर्घ पल्ल्याच्या धावपटूंसाठीचे प्रशिक्षण केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या पश्चिम केनियामधील कप्सबेट शहराजवळ ही घटन घडली.
किप्टमचा जन्म आणि संगोपन याच परिसरात झाले होते. एक 24 वर्षीय महिला देखील कारमध्ये होती आणि तिला गंभीर जखमी अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. किप्टम आणि हकिझिमाना यांचा जागीच मृत्यू झाला. अधिकृत शर्यतीत 2 तास 1 मिनिटापेक्षा कमी वेळेत मॅरेथॉन पूर्ण करणारा किप्टम हा पहिला खेळाडू ठरला होता. त्याने ऑक्टोबरमध्ये शिकागो येथे ही कामगिरी करून 2 तास 35 सेकंदांच्या वेळेनिशी जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता आणि केनियन सहकारी तसेच महान मॅरेथॉनपटू एलिउड किपचोगे याला मागे टाकले होते. किप्टम व किपचोगे यांच्यात पॅरिसमधील मॅरेथॉनमध्ये मोहक लढाई अपेक्षित होती आणि किप्टमचा मोसम एप्रिलमध्ये होणार असलेल्या रॉटरडॅम मॅरेथॉनमधून सुरू होणार होता.
Home महत्वाची बातमी विश्वविक्रमी मॅरेथॉनपटू केल्विन किप्टमचा अपघाती मृत्यू
विश्वविक्रमी मॅरेथॉनपटू केल्विन किप्टमचा अपघाती मृत्यू
वृत्तसंस्था/ नैरोबी (केनिया) मॅरेथॉन विश्वविक्रमधारक केल्विन किप्टम याला केनियामध्ये झालेल्या कार अपघातात प्रशिक्षकासह मृत्यू येण्याची घटना घडली आहे. केल्विन हा दीर्घ पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतींचा सुपरस्टार बनला होता आणि यावर्षी पॅरिस येथे होणार असलेल्या ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकाचा अव्वल दावेदार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. रविवारी उशिरा हा अपघात घडला. यावेळी किप्टम गाडी चालवत होता. सदर गाडी रस्त्याच्या […]