जागतिक नंबर वन खेळाडू राफेल नदाल आणि नाओमी ओसाका ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्पर्धात्मक टेनिसमध्ये परतणार

माजी जागतिक नंबर वन खेळाडू राफेल नदाल आणि नाओमी ओसाका रविवारपासून येथे सुरू होणाऱ्या ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्पर्धात्मक टेनिसमध्ये परतणार आहेत. माजी ऑस्ट्रेलियन आणि यूएस ओपन चॅम्पियन ओसाका आई झाल्यानंतर पुन्हा खेळात परतणार असून तिने …

जागतिक नंबर वन खेळाडू राफेल नदाल आणि नाओमी ओसाका ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्पर्धात्मक टेनिसमध्ये परतणार

माजी जागतिक नंबर वन खेळाडू राफेल नदाल आणि नाओमी ओसाका रविवारपासून येथे सुरू होणाऱ्या ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्पर्धात्मक टेनिसमध्ये परतणार आहेत. माजी ऑस्ट्रेलियन आणि यूएस ओपन चॅम्पियन ओसाका आई झाल्यानंतर पुन्हा खेळात परतणार असून तिने बुधवारी येथे सराव सत्रात भाग घेऊन तयारी सुरू केली.

 

ओसाकाने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमधून माघार घेतली आणि नंतर ती गर्भवती असल्याचे उघड झाले. दुखापतीतून सावरल्यानंतर नदालही पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. त्याला ब्रिस्बेनमध्ये विम्बल्डन अंतिम फेरीतील मॅटिओ बेरेटिनी आणि 2020 यूएस ओपन चॅम्पियन डॉमिनिक थिएम यांच्याकडून खडतर आव्हान असेल.

 

जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेला होल्गर रून हा या स्पर्धेत सहभागी होणारा सर्वोच्च क्रमांकाचा खेळाडू आहे. अमेरिकेचा बेन शेल्टन आणि तीन वेळचा ग्रँडस्लॅम एकेरी चॅम्पियन अँडी मरेही या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

 

महिला एकेरीत ओसाका व्यतिरिक्त सध्याची ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन आर्यना सबालेन्का, एलेना रायबाकिना, जेलेना ओस्टापेन्को, व्हिक्टोरिया अझारेंका, सोफिया केनिन आणि सलोन स्टीफन्स या स्पर्धेत आपले नशीब आजमावतील.

Edited By- Priya DIxit  

 

Go to Source