World Cup 2023:एकतर्फी पराभवाने क्रिकेटप्रेमींची निराशा
भारतीय संघाने विश्वकप स्पर्धेत सलग 10 विजय मिळवल्यामुळे विश्वचषक भारतीयांना मिळणार क्रिकेट प्रेमींच्या आशा जागा झाल्या.मात्र फायनलच्या दिवशी भारतीय संघाच्या प्रदर्शनामुळे क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा भंगल्या.
भारतीय संघाने पहिल्या दहा षटकांत केलेल्या धावा आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाचे मिळलेले तीन विकेट्स पाहून क्रिकेट प्रेमींना दिलासा मिळाला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटप्रेमींना निराश केले. आणि भारताचा संघाला पराभव स्वीकारावे लागले.
भारतीय संघाचा डाव सुरु झाल्यावर क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीचा उत्साह होता. मात्र एका पाठोपाठ विकेट्स पडल्यावर क्रिकेटप्रेमींना चांगलीच निराशा झाली. ऑस्ट्रेलियाच्या खेळ सुरु झाल्यावर सुरुवातीला 3 विकेट्स घेतल्यावर भारतीयांच्या आशा पल्लवित झाल्या मात्र नंतर ऑस्ट्रेलियाची पकड खेळावर मजबूत झाली आणि अखेर ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकले.
Edited by – Priya Dixit