काहेरमध्ये ‘बौद्धिक संपदा हक्क’ विषयावर कार्यशाळा

काहेर-केएससीएसटी यांच्यात समन्वय करार बेळगाव : काहेर विद्यापीठ व कर्नाटक स्टेट कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी (केएससीएसटी) यांच्यावतीने विद्यापीठामध्ये आयपीआर कक्ष सुरू करण्यात आला. केएससीएसटीचे कार्यकारी सचिव डॉ. यू. टी. विजय यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. याच निमित्ताने ‘बौद्धिक संपदा हक्क’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात  आली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. एस. गणाचारी यांनी स्वागत […]

काहेरमध्ये ‘बौद्धिक संपदा हक्क’ विषयावर कार्यशाळा

काहेर-केएससीएसटी यांच्यात समन्वय करार
बेळगाव : काहेर विद्यापीठ व कर्नाटक स्टेट कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी (केएससीएसटी) यांच्यावतीने विद्यापीठामध्ये आयपीआर कक्ष सुरू करण्यात आला. केएससीएसटीचे कार्यकारी सचिव डॉ. यू. टी. विजय यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. याच निमित्ताने ‘बौद्धिक संपदा हक्क’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात  आली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. एस. गणाचारी यांनी स्वागत केले व आयटीआर कक्षाबद्दल माहिती दिली. डॉ. यू. टी. विजय यांनी बौद्धिक संपदा हक्क म्हणजे काय? याचे विवेचन केले. कक्षाचे कार्यकारी सदस्य डॉ. शिवयोगी हुगार तसेच अध्यक्ष डॉ. एस. एस. गौडर यांचेही यावेळी भाषण झाले. याचवेळी काहेर आणि केएससीएसटी यांच्यामध्ये समन्वय करार करण्यात आला. त्यावर काहेरचे कुलगुरु डॉ. नितीन गंगाणे तसेच उपरोक्त सर्व मान्यवर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी डॉ. सीमा हळ्ळीकेरीमठ, डॉ. पुण्या अंगडी, डॉ. नेहा धडेद, डॉ. प्रीती साळवे, डॉ. विनय बन्नूर यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.