सेप्टिक टँकमध्ये गुदमरून कामगाराचा मृत्यू

म्हापसा एकतानगर येथे टाकी साफ करताना घडली दुर्दैवी घटना : अग्निशामक दालाने काढले बाहेर म्हापसा : एकतानगर येथील गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीजवळील एका घराची सेप्टिक टँक उपसण्यासाठी टँकमध्ये उतरलेल्या एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. यमनाप्पा मदार (24, रा. लक्ष्मीनगर-म्हापसा, मूळ बेळगाव) असे या मृत कामगाराचे नाव असून गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात […]

सेप्टिक टँकमध्ये गुदमरून कामगाराचा मृत्यू

म्हापसा एकतानगर येथे टाकी साफ करताना घडली दुर्दैवी घटना : अग्निशामक दालाने काढले बाहेर
म्हापसा : एकतानगर येथील गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीजवळील एका घराची सेप्टिक टँक उपसण्यासाठी टँकमध्ये उतरलेल्या एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. यमनाप्पा मदार (24, रा. लक्ष्मीनगर-म्हापसा, मूळ बेळगाव) असे या मृत कामगाराचे नाव असून गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना काल मध्यरात्री 12 वाजून 9 मिनिटांनी घडली. म्हापसा पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून या घटनेची नोंद केली आहे. एकतानगर भागातील गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीजवळील एका घराची सेप्टिक टँक रिकामी करण्याचे काम काल मध्यरात्री चार कामगारांनी हाती घेतले होते. यातील यमनाप्पा हा कामगार टँकमध्ये उरला होता. टँकचे तोंड अरुंद आणि खोली साधारण 4 मीटर खोल आहे. यातून तो आतमध्ये गेला आणि काही वेळात बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याला बाहेर काढण्यासाठी दुसरा कामगार आत उतरला, मात्र श्वास कोंडू लागल्याने तोही लगेच वर आला. शेवटी म्हापसा अग्निशामक दलाला पाचारण केल्यानंतय दलाचे जवान तिथे पोहोचले असता टँकचे तोंड अगदी लहान असल्याचे तसेच आत घातक वायू साठून राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे तोंड कापून रुंद केले. त्यानंतय एक जवान गौरेश गावस सुरक्षेची साधने वापरून आत उतरला. त्याने बेशुद्ध कामगाराला बाहेर काढले. नंतर त्याला इस्पितळात नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. टँकमध्ये साठलेल्या घातक वायूमुळे गुदमरून त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.