नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल इमारतीचे काम अंतिम टप्प्यात
नवी मुंबई (navi mumbai) आंतरराष्ट्रीय विमानतळातून (navi mumbai international airport) एप्रिल ते मे महिन्यापासून देशांतर्गत प्रवासी आणि मालवाहतुकीच्या पहिल्या उड्डाणाच्या यशस्वी संचलनासाठी सिडको महामंडळाने कंबर कसली आहे. शुक्रवारी सिडको (CIDCO) मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची पाहणी करुन प्रत्येक कामाचा आढावा घेतला. पाच तासांहून अधिक काळ विमानतळ प्रकल्पाच्या कार्यालयात चाललेल्या या बैठकीमध्ये विमानतळ टर्मिनलचे काम अंतिम टप्यात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिली.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मुंबई (mumbai) व नवी मुंबईतील उपनगरांशी जोडणाऱ्या रस्ते बांधकामासह इतर कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनु गोयल, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ) गीता पिल्लई तसेच सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचे अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी सिंघल यांनी सर्व कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश संबंधितांना दिले. या बैठकीमध्ये एरोनॉटिकल इन्फॉर्मेशन पब्लिकेशन आढावा घेण्यात आला. कोणतेही आंतरराष्ट्रीय स्तरावर विमानतळ सुरू करण्यापूर्वी संबंधित विमानतळ प्राधिकरणाला विमानतळ सुरू करत असल्याची अधिसूचना या पब्लिकेशनमार्फत जाहीर करावी लागते. तसेच विमान वाहतूक नियामक संस्थेकडून विमानतळाला एरोड्रोम परवान्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता होती त्याबाबत आणि विमानतळातील धावपट्टी, टर्मिनल इमारतसारख्या भौतिक पायाभूत सुविधांचा या बैठकीत आढावा घेतला.17 एप्रिलला विमानतळाचे उदघाटन झाल्यानंतर मे महिन्यात विमानतळातून प्रत्यक्ष प्रवासी व मालवाहतूक सुरू करण्यासाठीच्या सिडकोच्या हालचाली जोरदार सुरू आहेत.हेही वाचामान्सूनच्या आधी मुंबईतील रस्त्यांची कामे पूर्ण होणारमहापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्यसेवेसाठी 7,380 कोटी रुपयांची तरतूद
Home महत्वाची बातमी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल इमारतीचे काम अंतिम टप्प्यात
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल इमारतीचे काम अंतिम टप्प्यात
नवी मुंबई (navi mumbai) आंतरराष्ट्रीय विमानतळातून (navi mumbai international airport) एप्रिल ते मे महिन्यापासून देशांतर्गत प्रवासी आणि मालवाहतुकीच्या पहिल्या उड्डाणाच्या यशस्वी संचलनासाठी सिडको महामंडळाने कंबर कसली आहे.
शुक्रवारी सिडको (CIDCO) मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची पाहणी करुन प्रत्येक कामाचा आढावा घेतला.
पाच तासांहून अधिक काळ विमानतळ प्रकल्पाच्या कार्यालयात चाललेल्या या बैठकीमध्ये विमानतळ टर्मिनलचे काम अंतिम टप्यात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिली.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मुंबई (mumbai) व नवी मुंबईतील उपनगरांशी जोडणाऱ्या रस्ते बांधकामासह इतर कामांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनु गोयल, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ) गीता पिल्लई तसेच सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचे अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी सिंघल यांनी सर्व कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश संबंधितांना दिले.
या बैठकीमध्ये एरोनॉटिकल इन्फॉर्मेशन पब्लिकेशन आढावा घेण्यात आला. कोणतेही आंतरराष्ट्रीय स्तरावर विमानतळ सुरू करण्यापूर्वी संबंधित विमानतळ प्राधिकरणाला विमानतळ सुरू करत असल्याची अधिसूचना या पब्लिकेशनमार्फत जाहीर करावी लागते.
तसेच विमान वाहतूक नियामक संस्थेकडून विमानतळाला एरोड्रोम परवान्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता होती त्याबाबत आणि विमानतळातील धावपट्टी, टर्मिनल इमारतसारख्या भौतिक पायाभूत सुविधांचा या बैठकीत आढावा घेतला.
17 एप्रिलला विमानतळाचे उदघाटन झाल्यानंतर मे महिन्यात विमानतळातून प्रत्यक्ष प्रवासी व मालवाहतूक सुरू करण्यासाठीच्या सिडकोच्या हालचाली जोरदार सुरू आहेत.हेही वाचा
मान्सूनच्या आधी मुंबईतील रस्त्यांची कामे पूर्ण होणार
महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्यसेवेसाठी 7,380 कोटी रुपयांची तरतूद