मालवण नगरपरिषद समोरील रस्त्याच्या साईडपट्टीचे काम सुरु
उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या मागणीची बांधकाम विभागाकडून तात्काळ दखल
मालवण | प्रतिनिधी : उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या मागणीची दखल मालवण सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ घेतली आहे. मालवण नगरपरिषद समोरील मालवण कसाल मुख्य रस्त्याची साईड पट्टी तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. जनहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे हे काम हाती घेतल्याबद्दल दीपक पाटकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. या रस्त्याची साईड पट्टी पूर्णपणे उखडून गेल्याने याठिकाणी अपघात घडत होते. सायकलवरून जाणारी शाळकरी मुले पडून त्यांना दुखपत झाली होती. याचा विचार करता उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण कार्यालयाचे लक्ष वेधत साईड पट्टी करून रस्ता सुस्थितीत करावी अशी मागणी केली होती. याची दखल घेत बांधकाम विभागाने कामास सुरुवात केली आहे. याबाबत दीपक पाटकर यांनी बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अजित पाटील यांचे आभार मानले आहेत. खासदार नारायण राणे साहेब यांची शिकवण आहे, जनहिताची कामे तातडीने आणि प्राधान्याने केली पाहिजेत. त्यानुसार आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना मालवण शहराच्या विकासासाठी व जनसेवेसाठी कटिबद्द असल्याचे दीपक पाटकर यांनी सांगितले.
फोटो : मालवण नगरपरिषद समोरील मुख्य रस्ता साईड पट्टीचे काम सुरू करण्यात आले. (अमित खोत, मालवण)
Home महत्वाची बातमी मालवण नगरपरिषद समोरील रस्त्याच्या साईडपट्टीचे काम सुरु
मालवण नगरपरिषद समोरील रस्त्याच्या साईडपट्टीचे काम सुरु
उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या मागणीची बांधकाम विभागाकडून तात्काळ दखल मालवण | प्रतिनिधी : उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या मागणीची दखल मालवण सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ घेतली आहे. मालवण नगरपरिषद समोरील मालवण कसाल मुख्य रस्त्याची साईड पट्टी तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. जनहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे हे काम हाती घेतल्याबद्दल दीपक पाटकर यांनी समाधान व्यक्त […]
