रोहयोतून 31 हजार कामगारांच्या हाताला काम
बेळगाव तालुक्यात 6,292 जणांना काम उपलब्ध
बेळगाव : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत 31 हजार 374 जणांच्या हातांना काम उपलब्ध झाले आहे. ग्रामीण भागात रोहयो योजना अधिक प्रभावीपणे राबविली जात आहे. त्यामुळे कामगारांच्या हातांना काम मिळू लागले आहे. बेळगाव तालुक्यात 6 हजार 292 जणांना काम उपलब्ध झाले आहे. यंदा पावसाअभावी रोहयो कामांच्या मागणीत वाढ झाली आहे. गोरगरिबांचा आर्थिक स्तर उंचावावा आणि हाताला काम उपलब्ध व्हावे, यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे. या अंतर्गत रस्ते, गटारी, तलाव, शाळांची दुरुस्ती आदी कामे राबविली जात आहेत. शिवाय प्रत्येक कुटुंबाला 100 दिवस काम देणेही बंधनकारक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 398 ग्राम पंचायतींमध्ये रोजगार हमी योजना सुरू झाली आहे. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे रोजगार हमी योजना सुरळीत सुरू नव्हती. मात्र यंदा रोजगार कामे उपलब्ध करून दिली जात आहेत. पावसाअभावी जॉब कार्डधारकांची मागणीही वाढू लागली आहे. त्यामुळे एकूण रोजगार कामगारांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा अधिक दिवस काम देणे आवश्यक आहे. बेळगाव तालुक्यातील 57 ग्राम पंचायतींपैकी 48 ग्राम पंचायतींमध्ये रोजगार कामे सुरू आहेत. यामध्ये 6 हजार 292 कामगार काम करू लागले आहेत.
Home महत्वाची बातमी रोहयोतून 31 हजार कामगारांच्या हाताला काम
रोहयोतून 31 हजार कामगारांच्या हाताला काम
बेळगाव तालुक्यात 6,292 जणांना काम उपलब्ध बेळगाव : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत 31 हजार 374 जणांच्या हातांना काम उपलब्ध झाले आहे. ग्रामीण भागात रोहयो योजना अधिक प्रभावीपणे राबविली जात आहे. त्यामुळे कामगारांच्या हातांना काम मिळू लागले आहे. बेळगाव तालुक्यात 6 हजार 292 जणांना काम उपलब्ध झाले आहे. यंदा पावसाअभावी रोहयो कामांच्या मागणीत वाढ झाली आहे. […]