महिलांनी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक
स्त्रीरोगतज्ञ विद्या जोशी : जीवनविद्या मिशनतर्फे ‘डॉक्टर तुमच्या भेटीला’ कार्यक्रम
बेळगाव : आपण आपल्या कुटुंबाचा महत्त्वाचा खांब आहोत, याचा सार्थ अभिमान महिलांनी जरूर बाळगावा. परंतु हा खांब सतत ताठ ठेवताना किती त्याग करायचा, स्वत:कडे किती दुर्लक्ष करायचे, याचाही विचार करायला हवा. अति काळजी करून ताण घेऊन अनारोग्य वाढवून घेऊ नका, योग्य आहार, व्यायामाच्या माध्यमातून स्वत:ची काळजी घ्या, असे आवाहन पुण्याच्या स्त्रीरोगतज्ञ डॉ. विद्या जोशी यांनी केले. जीवनविद्या मिशन बेळगाव शाखेतर्फे रविवारी गोगटे रंगमंदिर येथे ‘डॉक्टर तुमच्या भेटीला’ हा कार्यक्रम झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. दुसऱ्या सत्रात रेडिओलॉजिस्ट डॉ. शिल्पा लाड यांचे ब्रेस्ट कॅन्सर या विषयावर स्लाईडच्या माध्यमातून व्याख्यान झाले. डॉ. विद्या म्हणाल्या, निसर्गानेच स्त्रीला मातृत्वाचे वरदान दिले आहे. आजही स्त्रिया आपल्या आरोग्याच्या प्रश्नांबाबत मोकळेपणाने बोलत नाहीत. बालपणी त्या खूप आनंदी असतात. परंतु वयात येताना मेनोपॉज टप्प्यावर त्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवतात. मुळात पाळी येणे ही खूप नैसर्गिक गोष्ट आहे. त्यामुळे तिला कलुषित भावनेने बघू नका.
या काळात कॉफी, चहाचे सेवन तसेच साखरेचे प्रमाण कमी करा. व्हिटॅमिनच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या, किमान 20 मिनिटे एरोबिकचे व्यायाम करा, मेनोपॉजमध्ये स्त्रीच्या मानसिकतेमध्ये बदल होतात. अशा वेळी तिने स्वत:ला दोषी समजू नये आणि कुटुंबीयांनी तिला सांभाळून घ्यावे, असे सांगून आपल्या आरोग्याच्या काळजीबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. शिल्पा लाड यांनी ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत असून महिलांनी वेळीच काळजी घ्यावी. पाळीच्या सातव्या दिवशीच स्वत:च तपासणी करावी. गाठ आढळली तर डॉक्टरांना दाखवा. कारण दोन सें. मी. पेक्षा गाठ वाढते तेव्हा ब्रेस्ट काढण्याची वेळ येते. पण उपचाराने सर्व काही ठीक होते, हा विश्वास बाळगावा. प्रत्येक महिलेने मेमोग्रॅम करून घ्यावा. केवळ सात सेकंदात ही तपासणी होते, असे त्या म्हणाल्या. बेळगाव शाखाध्यक्षा सुनीता बेकवाडकर व सचिव सुनीता पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मधुरा शिरोडकर यांनी केले.
Home महत्वाची बातमी महिलांनी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक
महिलांनी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक
स्त्रीरोगतज्ञ विद्या जोशी : जीवनविद्या मिशनतर्फे ‘डॉक्टर तुमच्या भेटीला’ कार्यक्रम बेळगाव : आपण आपल्या कुटुंबाचा महत्त्वाचा खांब आहोत, याचा सार्थ अभिमान महिलांनी जरूर बाळगावा. परंतु हा खांब सतत ताठ ठेवताना किती त्याग करायचा, स्वत:कडे किती दुर्लक्ष करायचे, याचाही विचार करायला हवा. अति काळजी करून ताण घेऊन अनारोग्य वाढवून घेऊ नका, योग्य आहार, व्यायामाच्या माध्यमातून स्वत:ची […]