नेरूल पंचायतीवर पाण्यासाठी महिलांचा मोर्चा

पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी, 23 पासून पाणी मिळेल सरपंचाचे आश्वासन वार्ताहर /कांदोळी नेरूल पंचायत क्षेत्रात गेला महिनाभर नळाना धड पाणी येत नसल्याने महिलांना  पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाण्यासाठी शनिवारी दुपारी महिलांनी नेरूल पंचायतीवर मोर्चा नेला. सरपंच राजेश कळंगुटकर व इतर पंच सदस्यांना निवेदन  सादर करून  पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. नेरूल गावात गेला महिनाभर […]

नेरूल पंचायतीवर पाण्यासाठी महिलांचा मोर्चा

पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी, 23 पासून पाणी मिळेल सरपंचाचे आश्वासन
वार्ताहर /कांदोळी
नेरूल पंचायत क्षेत्रात गेला महिनाभर नळाना धड पाणी येत नसल्याने महिलांना  पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाण्यासाठी शनिवारी दुपारी महिलांनी नेरूल पंचायतीवर मोर्चा नेला. सरपंच राजेश कळंगुटकर व इतर पंच सदस्यांना निवेदन  सादर करून  पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. नेरूल गावात गेला महिनाभर तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पदरचे पैसे खर्च करून टँकर मागवावा लागत आहे. पंचायत टँकरद्वारे पाणी पुरवठा का करत नाही, असा सवाल महिलांनी पंचायत मंडळाला केला. त्याना उत्तर देताना दि.23 डिसेंबर पासून नेरूल पंचायत क्षेत्रातील सर्व वाड्यावर सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याचे आश्वासन सरपंच कळंगुटकर यांनी दिले. सद्या पंचायत फंडातून टँकरद्वारे पाणी पुरवठा करीत आहे त्याचबरोबर स्थानिक आमदार केदार नाईक यांनीही नेरूल गावांना  टँकर मागवून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे सरपंचाने सांगितले. तिळारी कालव्याच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने तिळारी प्रकल्पातून सोडण्यात येणारे पाणी  बंद ठेवण्यात आले.  त्यामुळे पाण्याची टंचाई भासत आहे  ती लवकरच दूर होईल, असा विश्वास सरपंच राजेश कळंगुटकर यांनी  महिलांना दिला.

Go to Source