नाशिकात मंगळसूत्र चोरणाऱ्याला महिलांनी दिला चांगलाच चोप

नाशिकात मंगळसूत्र चोरण्याचा प्रकरणात वाढ झाली आहे. मात्र मंगळसूत्र चोरणाऱ्याला दोन महिलांनी मिळून चांगलाच चोप दिल्याची घटना घडली असून या महिलांच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झाली असून चोराचा शोध घेत आहे.

ALSO READ: शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात राज ठाकरे-संजय राऊत एकाच मंचावर,राज ठाकरे यांनी राज्य सरकारला आव्हान दिले

सदर घटना सोमवारची असून नाशिक रोड परिसरातील जय भवानी रोडवर चव्हाण मळा येथील असून दोन वयोवृद्ध महिला देवदर्शनासाठी जात असताना घडली आहे. एक व्यक्ती बाईकने येतो आणि महिलां जवळ पत्ता विचारण्याच्या बहाण्याने  येऊन फिर्यादीच्या गळ्यातील अडीच तोळे वजनी मंगळसूत्र ओढतो आणि बाईक जवळ पळून जाण्यासाठी जातो.

ALSO READ: नागपूर : ९ लग्न, लाखोंची फसवणूक…’लुटणाऱ्या नवरीला’ अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
या वेळी त्या महिला आरडाओरड करत त्याच्या मागे धावत त्याच्यावर झडप घालतात आणि दुचाकीवरून खाली पाडून चांगलाच चोप देतात. या दोघी महिला नणंद आणि भावजय आहे. 

ALSO READ: छत्रपती संभाजीनगर : बनावट नोटा छापणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश; ६० लाख रुपयांच्या नोटा जप्त

महिलांकडून अचानक झालेल्या हल्ल्याला घाबरून चोर बॅग आणि बाईक सोडून तिथून पळ काढतो. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी चोराची बॅग तपासल्यावर त्यांना बॅगेत दोन सोन्याचे मंगळसूत्र सापडले. 

सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी या आधारे चोराची ओळख पटवली आहे. पोलीस चोरट्याचा शोध घेण्यासाठी लागले आहे. 

Edited By – Priya Dixit  

Go to Source