संदेशखालीत जाण्यास महिलांना बंदी
वृत्तसंस्था /संदेशखाली
पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे परिस्थिती पाहण्यासाठी जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांना तेथील प्रशासनाकडून आडविले आहे. शेकडोंच्या संख्येने संदेशखालीकडे जात असलेल्या महिला कार्यकर्त्यांचा मार्ग रोखण्यात आल्यामुळे भारतीय जनता पक्षाने संताप व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाला लोकशाही शिकविणाऱ्या विरोधी पक्षांनी पश्चिम बंगालमध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचारांवर एक ब्र ही काढलेला नाही. यातून त्यांची पक्षपाती मनोवृत्ती दिसून येते. जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी व्यक्त केली. आंदोलनासाठी निघालेल्या महिला कार्यकर्त्या आणि पोलीस अधिकारी यांच्यात बराच काळ शब्दाशब्दी झाली. अखेर महिलांनी मार्गातच धरणे धरले. ममता बॅनर्जींचे पोलिस आमच्याशी उद्धटपणे व्यवहार करत आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्था परिस्थिती पूर्ण बिघडली आहे. ममता बॅनर्जी सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. ममता बॅनर्जींच्या राज्यात लोकशाहीला कोणतेही स्थान उरलेले नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत याची किंमत बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष यांना भोगावी लागणार आहे, असा इशाराही भाजपने दिला आहे.
कसून चौकशी होणार
संदेशखाली येथे महिलांवर अत्याचार करण्याचा आरोप असणाऱ्या शहाजहान शेख या तृणमूल काँग्रेस नेत्याचा ताबा बुधवारी सीबीआयकडे देण्यात आला आहे. त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून अनेक बाबी बाहेर पडणार असून शेख याचे कोणाकोणाशी लागेबांधे आहेत, याचा पर्दाफाश लवकरच होईल, अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या व्यक्त करीत आहेत.
Home महत्वाची बातमी संदेशखालीत जाण्यास महिलांना बंदी
संदेशखालीत जाण्यास महिलांना बंदी
वृत्तसंस्था /संदेशखाली पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे परिस्थिती पाहण्यासाठी जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांना तेथील प्रशासनाकडून आडविले आहे. शेकडोंच्या संख्येने संदेशखालीकडे जात असलेल्या महिला कार्यकर्त्यांचा मार्ग रोखण्यात आल्यामुळे भारतीय जनता पक्षाने संताप व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाला लोकशाही शिकविणाऱ्या विरोधी पक्षांनी पश्चिम बंगालमध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचारांवर एक ब्र ही काढलेला नाही. यातून त्यांची पक्षपाती […]
